top of page

वाल्मिक कराडची सुपारी का दिली?

करुणा शर्मांनी धनंजय मुंडेकडे बोट दाखवत केले धक्कादायक खुलासे




मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या बनावट एनकाऊंटरसाठी कोट्यावधींची सुपारी दिल्याचा दावा निलंबीत पोलिस अधिकारी रंजीत कासले यांनी केला आहे. पण ही सुपारी का दिली गेली असावी? यावर करुणा शर्मा यांनी थेट धनंजय मुंडे यांच नाव घेत धक्कादायक आरोप केले आहेत.


करुणा शर्मा यांच्या मते, वाल्मिक करडाला संपविण्याचा प्रयत्न करण्यामागे एक मोेठ कारण असू शकते. त्यांनी आरोप केला आहे की, धनंजय मुंडे यांचे सर्व काळे कारणामे वाल्मिक कराडकडे आहेत. ही संवेदनशिल माहिती बाहेर येऊ नये म्हणूनच कराडला मार्गातून दूर करण्यासाठी ही कथीत सुपारी दिली गेली असावी, असा संशय करुणा शर्मा यांनी व्यक्त केला आहे.


शर्मा पुढे म्हणाल्या की, या कामासाठी कथीत पाच कोटींची ऑफर ही खूप छोटी रक्कम आहे. हे लोक (अशा कामांसाठी) शंभर कोटी रुपये सुद्धा देऊ शकतात असा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यांच्या मते वाल्मिक कराडकडे असलेली माहिती इतकी महत्वाची असू शकते की त्याला संपविण्यासाठी मोठी किंमत मोजायलाही काही लोकं तयार होऊ शकतात.


हे सर्व पैशाच्या जोरावर चालणारे राजकारण आहे असेही त्या म्हणाल्या. बीड येथील निलंबीत पोलिस अधिकारी रनजित कासले यांनी हा मुळ दावा केला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हात्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा बनावट एनकाऊंटर करण्याची ऑफर मिळाली होती, असा कासले यांचा दावा आहे.



या कामासाठी पाच ते दहा कोटींपासून 50 कोटींपर्यंतची रक्कम देवू केली होती, असेही त्यांनी म्हटले आहे. करुणा शर्मा (ज्या करुणा मुंडे म्हणूनही ओळखल्या जातात) यांनी रनजित कासले यांच्या या दाव्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ‘ते पोलिस अधिकारी आहेत’, त्यामुळे ते खोटे बोलणार नाहीत’, असे शर्मा म्हणाल्या कासले यांच्या दाव्यामुळेच वाल्मिक कराडला धोका का असू शकतो यावर शर्मा यांनी आपले मत मांडत धनंजय मुंडे यांच्या कथीत संबंधावर बोट ठेवले आहे.

Comments


bottom of page