वाल्मिक कराडच्या टोळीकडूनच माझ्या पतीला मारहाण
- Navnath Yewale
- Apr 7
- 2 min read

बीड, दि. 7 : बीड जिल्हा कारगृहात वाल्मिक कराड यांच्या टोळीकडूनच महादेव गित्ते यांना मारहाण करण्यात आली. कारागृह प्रशासनाने वाल्मिक कराड व त्याच्या टोळी ऐवजी महादेव गित्ते यांनाच इतर कारागृहात हलवले. मारहाणीच्या घटनाक्रमाचे कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करत सोमवारी (दि.7) महादेव गित्ते यांच्या पत्नी मिरा गित्ते यांनी पोलिस अधिक्षक नवनित कावत यांची भेट घेवून निवेदनाद्वारे गंभीर आरोप केले आहेत.
परळी येथील बापु अंधळे हत्या प्रकणात कैंदेत असलेल्या महादेव गित्ते व संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड व त्याचे सहकारी यांच्यात कारागृहामध्येच राडा झाला होता. वाल्मिक कराड यांना महादेव गित्ते व त्यांच्या गँगकडून मारहाणीची वार्ता पसरली. कारागृहातील दोन टोळीत झालेल्या राड्यावरुन कारागृह प्रशासनाच्या जबाबदार्यांवर प्रश्न निर्माण करण्यात आला. कारागृहामध्ये दोन्ही टोळीत झालेल्या मारहाण प्रकरणावरुन पोलिस अधिक्षक नवनित कावत यांच्याकडेही राजकारण्यांकडून बोट दाखवण्यात आले.
यावर खबरदारीची उपाय योजना म्हणून कारागृह प्रशासनाने वाल्मिक कराड यास मारहणीच्या वृत्ताचे खंडण करत महावदेव गित्ते व आठवले यांना हर्सूल (छत्रपती संभाजी नगर) व नशिक कारागृहात हलवले. कारागृह प्रशासन कैंद्यांना जवळच्या नातेवाईकांना फोनवर बोलण्याची परवानगी देेते. एकाच फोनवरुन नंबर प्रमाणे कैंद्यांना नातेवाईकांशी मर्यादीत वेळत संवाद साधता येतो. त्या अनुषंगाने घटनेच्या दिवशी महादेव गित्ते व वाल्मिक कराड यांच्या फोन लावण्याच्या कारणांवरुन मारहाणीचा प्रकार घडल्याचे आमदार सुरेश धस म्हणले.
वाल्मिक कराड व त्याच्या गँगने मारहाण केलेल्या महादेव गित्तेलाच इतर कारागृहात पाठल्याचा आरोप करत मिरा गित्ते यांनी कारागृह प्रशासनाकडे घटनाक्रमाच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. प्रशासनाकडून न्यायाच्या अपेक्षेने सोमवारी महादेव गित्ते यांनी पोलिस अधिक्षक नवनित कावत यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिल्याचे मिरा गित्ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या.
मिरा गित्ते यांनी दिलेल्या निवेदनात खळबजनक आरेाप केले आहेत. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन पूर्वी गावात आम्हाला 50 ते 60 लोकांकडून माझ्या पतीसह मला मारहाण करण्यात आली होती. लहान लेकरं जवळ असताना लोकांचा जमाव आमच्या घरी आला आणि वाल्मिक आण्णांनी तुम्हाला मारायला पाठवलं आहे असं म्हणत आम्हाला मारहाण केली.यामध्ये माझ्या हाताला दुखापत झाली.
त्या दिवशी कारागृहामध्येही वाल्मिक कराड गँग कडूनच महादेव गित्ते यांना मारहाण झाल्याचे त्यांनी सकाळी फोनवरुन सांगीतले होते. तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलात... बाहेर भेटलो असतो तर संतोष देशमुख पेक्षा वाईट हाल केले असते अशी धमकी सुदर्शन घुले याने दिल्याचा आरोपही मिरा गित्ते यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
Comentários