top of page

वाल्मिक कराड म्हणे, तो मी नव्हेच!




संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्या प्रकरणात आपण निर्दोष आहोत. माझा या प्रकरणांशी काहीही संबंध नाही असा अर्ज मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांनी मा. न्यायालयात सादर केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, वाल्मिक कराड याच्या आर्जावर सीआडी ने आपले म्हणणे मांडावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकाणाची आज तीसरी सुणावनी बीड च्या सत्र न्यायालयामध्ये पार पडली. सुनावणी नंतर विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आरोपी क्रमांक एक (वाल्मिक कराड) याने कोर्टाकडे खल्याशी संबधींत कागदपत्रांची मागणी केली होती. ती सगळी कागदपत्र सीआयडीमार्फत न्यायालयात साद करण्यात आली. मात्र, काही दस्तऐवज सीलबंद असल्यामुळे ते सील उघडल्यानंतरच त्याच्या प्रती देण्यात याव्यात अशी विनंती कोर्टाला करण्यात आली.


अ‍ॅड. निकम पुढे म्हणाले की, वाल्मिक कराडने एक अर्ज दाखल केला असून स्वत: निर्दोष म्हटलं आहे. या खटल्यातून मला मुक्त करावे, कारण माझ्याविरूद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, खून किंवा खंडणीमध्ये मी नाही, असा अर्ज कराडने कोर्टात दाखल केल्याचे उज्जवल निकम यांनी सांगितलं.


पुरावा नाही, खून किवा खंडणीमध्ये मी नाही, असा अर्ज कराडने कोर्टात दाखल केल्याचे उज्वल निकम यांनी सांगितलं त्यावर कोर्टाने सीआयडी आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. येत्या 24 तारखेला हे म्हणणं न्यायालयात सादर केलं जाणार आहे. त्यावर सुनावणी होईल, वाल्मिकच्या बाजूने आणि सरकारच्या बाजूने युक्तिवाद होतील, असं उज्वल निकम यांनी सांगितलं.


त्यावर कोर्टाने सीआयडीला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. येत्या 24 तारखेला हे म्हणणं न्यायालयात केलं जाणार आहे. त्यावर सुनावणी होईल, वाल्मिकच्या बाजूने आणि सरकारच्या बाजूने युक्तिवाद होतील, खून आणि खंडणीच्या प्रकरणात आपला संबध नाही, हे दाखवण्याचा वाल्मिकचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्यावर 24 तारखेला सीआयडी आपलं म्हणणं मांडेल आणि त्यावर सविस्तर युक्तिवाद हाईल. मकोका कायद्यांतर्गत सर्व आरोपींची सपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज दाखल केल्याचंही अ‍ॅड . उज्वल निकम म्हणाले.

Kommentare


bottom of page