वाल्मीक कराडची आरोग्य तपासणी: औषधोपचारानंतर पुन्हा कारागृहात रवानगी ; ताप आणि पोटदुखीचा त्रास, रुग्णालय परिसरात गर्दी, तगडा पोलिस बंदोबस्त
- Navnath Yewale
- Apr 17
- 2 min read

बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याने पोटदुखीची तक्रार केल्यानंतर त्याला आज शुक्रवारी (दि.17) बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. विविध तपासण्या, औधोपचारानंतर वाल्मीक कराडची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. काही तासांसाठी तुरूंगातून बाहेर आलेल्या वाल्मीकची अवस्था पाहून अनेकांनी अश्चर्य व्यक्त केले.
मस्साजोग (ता. केज) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या मुत्राशयावर सूज आल्यामुळे त्याला पोटदुखीचा त्रास आणि ताप आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सात दिवसांच्या औषधोपचारानंतर पुन्हा तपासणीचा सल्ला वाल्मीकला देण्यात आला आहे. तपाव पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर वाल्मीक कराडला कारागृह प्रशासनाने शुक्रवारी तपासण्या व उपचारासाठी जिल्हा रुग्णलयात आणले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दीही झाली होती.
विविध वैद्यकिय तपासण्या करून औषधोपचारानंतर पुन्हा त्याला कारागृहात नेण्यात आले. 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य सुत्रधार असल्याचे विशेष तपास पथकाच्या तपासातून समोर आले. यासह आवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि कंपनीच्या मस्साजोगच्या प्रकल्पावरील मागासवर्गीय सुरक्षारक्षकाला शिवीगाळ व मारहाणीचा ठपकाही त्याच्यावर आहे.
दरम्यान, घटनेनंतर 22 दिवस फरारी असलेला वाल्मिक 31 डिसेंबर 2024 रोजी पोलिसांना शरण आला. गेल्या साडे पंधरा महिन्यांपासून तो सुरुवातील पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडीत येथील जिल्हा कारागृहात आहे. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठासह सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामिन अर्ज फेटाळला आहे.
वाल्मीक कराडला तपा व पोटदुखीचा त्रास असल्याने कारागृहातील वैद्यकीय अधिकार्यांकडून त्याला औषधोपचार केला जात होत. मात्र हा त्रास कमी होत नसल्याने आज त्याला तपासणी व उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. चौधरे व शल्यविशारद डॉ. वाघमारे यांनी त्याची तपासणी करुन सोनोग्राफी, सीटीस्कॅन तसेच रक्त व लघवीच्या तपासण्या करण्याचा सल्ला दिला.
तपासण्यांच्या अहवालातून त्याच्या मूत्राशयाच्या पिशवीला थोडीशी सुज असल्याने तपास व पोटदुखीचा त्रास असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याला सात दिवसांची औषधे देत पुन्हा सात दिवसांनी वैद्यकीय तनपासणीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर त्याला कारागृहात नेण्यात आले.



Comments