विकसीत शहरांसाठी 50 वर्षाचे नियोजन- मुख्यमंत्री फडवणीस
- Navnath Yewale
- Jun 18
- 2 min read

पिंपरी चिंचवड हे वाढते शहर असून त्याचवा विकास सुनियोजितरित्या होण्यासाठी शहराचा उत्तम आरखडा करा आणि पुढच्या पिढीचा विचार करून आगामी 50 वर्षाचे नियोजन व्हावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शहराचे नियोजन करत असताना जनतेला विश्वासात घेणे गरजेचे असून त्यादृष्टीने लोकप्रतिनिधी आणि जनेतेच्या मागणीनुसार चर्होलीची नगर रचना योजना रद्द करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतिने पुणे- आळंदी पालखी मागाृवर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञाणेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समुहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण, संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालन लोकार्पण यासह विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, श्रीकांत भारतीय, महेश लांडगे, शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, जिल्हाधिकारी, संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते.
संत ज्ञाणेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की,ज्ञाणेश्वर माऊलींनी सोप्या शब्दात भागवत धर्माचे तत्वज्ञान आणि आपला वैश्विक विचार आपल्यापर्यंत पोहोचविला. त्यामुळेच माऊलीच्या पालखीत लाखो वारकरी सहभागी होतात. संत नामदेव महाराजांनी ही परंपरा आपल्यापर्यंत अभंगाच्या माध्यमातून पोहोचवितान भागवत धर्मातील हा विचार पंजाबपर्यंत पोहोचविला. शिखांचा धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथसाहिब’ मध्ये संत नामदेव महाराजांचे विचार समाविष्ट आहेत. ज्यांनी भागवत धर्माला उंची दिली अशा देान संतश्रेष्ठांच्या भेटीचे शिल्प महानगरपालिकेने उभारले आहे. वारकरी संप्रदायात प्रत्येक जण एकमेकांना माऊली समजतो, ईश्वराचे रुप समजतो, हाच भाव या शिल्पात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
वैश्विक विचार जागाला साद घालणार:
जगाला साद घालणारा आणि दिशा देणारा असा आपला वैश्विक विचार आहे. एका पिढीने दुसर्याला दिल्याने तो टिकून आहे. जोपर्यंत वारी आहे तोपर्यंत विचार आहे, आणि सुर्य-चंद्र असेपर्यंत वारी आहे. या विचाराच्या प्रसारासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुंदर संतपीठ तयार केले. सीबीएसई अभ्यासक्रमासोबतच हा विचार पोहोचविण्याचे कार्य संतपीठाच्या माध्यामातून होत आहे. त्यामुळे संतपीठाच्या विस्तारासाठी आराखडे, नियोजन केल्यास त्याच्यापाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे राहिल असी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
Comments