top of page

विकृत भोंदूबाबा खरात न्यायालयासमोर बुचकळला ; साप आणि वाघ यबाबत माहित नाही, पाच दिवसात सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचंही म्हणाला

नाशिक: नाशिकमधील विकृत भोंदू बाबा अशोक खरात याला मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या गेल्या काही दिवसांच्या तपासात अशोक खरात हा त्याच्याकडील 20 फुटी सापाचा उपयोग करून त्याच्याकडे येणार्‍या भक्तांचे डोळे दिपवून टाकायचा, अशी माहिती समोर आली होती. मात्र, हा 20 फुटी सर्प खोटा होता, रिमोटच्या कंट्रोलच्या साह्याने तो ऑपरेट केला जात असे. मात्र, ही बाब खरातकडे येणार्‍या भक्तांना माकित नसल्याने ते यसा भोंदूबाबाच्या चमत्कारोन भारावून जायचे.


अशोक खरात याला काल न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा सरकारी वकिल शैलेंद्र बागडे यांनी नेमका हाच मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी अशोक खरातच्या चेहर्‍यावर काहीसे गांगरल्याचे भाव होते. संपूर्ण सुनावनी सुरू असताना अशोक खरात हा मान खाली घालून एकटक आपल्या हाताच्या बोटाकडे पाहत होता. सरकारी वकिलांनी 20 फुटी सर्प आणि वाघाचा मुद्दा उपस्थित करताच तो काहीसा चपापला. पाच दिवसांची काठडी सुनावण्यापूर्वी न्यायाधीशांनी अशोक खरात याला तुम्हाला काही बोलायचे आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावेळी खरात याने 20 फुटांच्या सापाबाबतचा आरोप साफ धुडकावून लावला.


मला साप, वाघ या विषयी काही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. मंदिरात कधीतरी जायचो. त्यावेळी 100 च्या आसपास लोक असायचे, शिवरात्र श्रावणी सोमवारी अशा वेळी जात होतो. 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तर दिली, असे उत्तर अशोक खरात याने दिले. सरकारी वकिलांनी अशोक खरात याच्या 7 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. दुसर्‍या बाजूला खरातच्या वकिलांनी पोलिस कोठडी वाढविणे गरजेचे नसल्याचा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकून न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


विकृत भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भोंदू खरातने 100 रुपये किलोचे चिंचोके लाखो रुपयांना विकले. चमत्मकारी खडा म्हणून भक्तांना दहा हजारांपासून लाखो रुपयांना विकून ती रक्कम ट्रस्टकडे वळविली. टर्कीचा शक्तीवर्धक मध म्हणून खरातने दहा लाख रुपये किलोने मध विकल्याचेही समोर आले आहे. हा मध खोल समुद्रात मिळत असल्यासचे सांगून त्याने भक्तांना गंडवून शेकडो कोटींची माया जमवली.


राज्यातील मंत्री, आमदारांसह नागरीसेवेतील अधिकारीही विकृत भोंदू बाबाच्या सानिध्यात आल्याचा धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. याशिवाय शेकडो महिलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ तपास यंत्रणेला उपलब्ध झाल्याने विकृत भोंदू बाबाच्या अपराधीक प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे.

Comments


bottom of page