top of page

विकृत मानसिकतेचे गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत

उमाकिरणमधील प्रकार विकृतीचा कळस; तपासावर महिला आयोगाचे बारकाईने लक्ष - रुपाली चाकणकर


बीड येथे उमाकिरण शैक्षणिक संकुलात शिकवणी वर्गात मुलींवर झालेला अत्याचाराचा प्रकार हा अतिशय विकृत मानसिकतेचा कळस आहे. 2023 पासून या शिकवणी वर्गामध्ये पुर्वीही दोन गुन्हे घडलेले आहेत. हा प्रकार पालक आणि विद्यार्थी दोघांनाही अस्वस्थ करणारा आहे. उमाकिरण संकुलामध्ये आयसीटी कमिटी नाही, विद्यार्थी पालक, शिक्षक याचीही समिती नाही आरोपी शिक्षक प्रशांत खाटोकर, आरोपी संचाल विजय पवार हे दोघेही कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. एसआयटी मार्फत महिला अधिकारी याचा कसून तपास करणार आहेत. या तपासावर महिला आयोगाचेही अतिशय बारकाईने लक्ष असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.


रुपाली चाकणकर या आज बीड जिल्हा दौर्‍यावर असताना पोलीस अधिक्षक कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तत्पूर्वी त्यांनी पीडित विद्यार्थीनीची आणि तिच्या कुटुंबाची भेट घेतली. मानसिक आधार देत दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असे अश्वासनही त्यांनी पीडित विद्यार्थीनीच्या कुटुंबियांना दिले आहे. आरोपी प्रशांत खाटोकर आणि शिकवणी वर्गाचे संचालक विजय पवार यांना बीडमधून बाहेर पडण्यासाठी मदत करणारे अजय नारायण बोदरे यांनाही तपासकामी पोलीसांनी नोटीस दिली आहे.


संचालक विजय पवार याच्या शिकवणी वर्गात 2023 मध्ये दोन विद्यार्थीनीला त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळीस संबंधित विद्यार्थीणीने आणि त्यांच्या पालकांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र ही तक्रार त्यांनी पोलीसांकडे केली असती तर त्यावेळेस त्यांनी ती गांभीर्याने घतली असती आणि आता जो उमाकिरण संकुलात प्रकार घडला तो घडला नसता असेही चाकणकर यांनी सांगितले.


2023 मध्ये त्रास दिलेल्या दोन विद्यार्थीनींच्या पुरवणी जबाबावरुन पोलीसांकडे गुन्हा नोंद होईलच. बीड शहरातील जवेढे शिकवणी वर्ग आहेत त्या सर्व शिकवणी वर्गामध्ये विद्यार्थी पालक समिती, आयसीटी कमिटी, सीसीटीव्ही व महिला कर्मचारी आहेत की नाहीत? या बाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या आहेत.


उमाकिरण संकुलामधील सीसीटीव्ही फुटेज, लॅपटॉप आणि मोबाईल ही सर्व उपकरणे फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आलेली आहेत. उमाकिरणच्या तापासाबाबत जिल्हा महिला बालकल्याणचे अधिकारीही लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे अशा प्रकारची विकृत मानसिकतेचे गुन्हेगार कोणत्याही परिस्थितीमध्ये कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत याची गंभीर्याने दखल महिला आयोग घेत आहे असेही यावेही चाकणकर यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला पोलीस अधिक्षक नवनित कॉवत हे उपस्थित होते.

Comentários


bottom of page