विजय घाडगे मारहाणीचा तटकरेंनी सामुहिक कट रचला, जरांगे पाटील
- Navnath Yewale
- Jul 22
- 2 min read
मराठा बोलला की मारहाण, इतरांणा मात्र वेगळा न्याय; मकोका अंतर्गत कारवाई करा

छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांची जरांगे पाटील यांनी लातूर येथील रुग्णालयात भेट घेतली. विजय घाडगे यांना मुक्का मार लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करून हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी माध्यमांशी बोलतांना जरांगे पाटील यांनी मारहाण प्रकरणी दोषींवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी करत सुनिल तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या निर्धार मेळाव्या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना शेतकर्यांच्या प्रश्नांवर निवेदन दिले. कृषीमंत्र्या विरोधात रोष व्यक्त करत निषेध म्हणून तटकरे यांच्या समोर घाडगे यांनी पत्ते फेकले. याचाच राग मनात धरुन राष्ट्रवादीचे तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी कार्यकर्त्यां समवेत जाऊन विजय घाडगे यांना लाथा, बुक्क्यांनी जबर माारहण केली होती.
विजय घाडगे यांना मारहाणेचे राज्यभरातून तीव्र पडसाद उमटले, मराठा संघटना आक्रमक झाल्या. जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही देण्यात आला. सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली. यावर सुरज चव्हान यांनी सोशल मिडीयावरून दिलगिरी व्यक्त केली. मात्र, पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी चव्हाण यांना तातडीने बोलावून त्यांचा सोमवारी (21 जूलै) राजीना घेतला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सोमवारी (21 जूलै) लातूर येथे विजय घाडगे यांनी भेट घेतली. घटनेची चौकशी करुन प्रकृतीबाबत विचारपूस केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले की, आता आमच्या लक्षात आलं आहे की, त्यांच्या नेत्यावर मराठा बोललकी त्यास थेट मारहाण, आणि इतर बोलला की त्यास भाऊ, ताई म्हणून कुरुवाळलं जातयं. केवळ मराठ्यांना एक आणि इतरांसाठी एक न्याय हीच का लोकशाही. आता लोकशाहीमध्ये हुकूमशाही सुरू झाली आहे. आत्तापर्यंत एवढ्या हुकूमशाह्या आल्या आणि इथच निस्तनाबूत झाल्या. लोकांच्या मनात आलं तर काही होऊ शकतं हे विसरू नका.
विजय घाडगे यांना मारहाणीचा सामुहिक कट रचण्यात आला. सुनिल तटकरे लातूरमध्ये असताना त्यांचे कार्यकर्ते जाऊन विजय घाडगे यांना मारहाण करतात, आणि परत तटकरेंना येऊन सांगतात. हा नियोजीत कटाचा सहभाग आहे. यामध्ये सुनिल तटकरे यांच्यासह सर्व दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली. लोकशाही मार्गाने राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत कोणीही हिंसेचा मार्ग अवलंबून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये असे अवाहनही पाटील यांनी यावेळी केले.



Comments