विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निरोप
- Navnath Yewale
- Jul 16
- 1 min read
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच मंचावर; ग्रूप फोटोसेशन

महाराष्ट्राच्या विधीमंडळात पावसाळी अधिकवेशन सुरू आहे. याच अधिवेशनात आज बुधवारी अंबादास दानवे यांचा निरोप संमारंभ झाला. या समारंभानंतर झालेल्या फोटोसेशनसाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फक्त एक खुर्चीचं अंतर होतं. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा फोटोसेशनसाठी एकत्र आले. शिवसेनेच्या दोन्ही गटाचे प्रमुख एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
शिवसेना फुटींनतर ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्याकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद सोपवलं होतं. अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ आज बुधवारी संपला. त्यानंतर दानवेंच्या निरोप समारंभ कार्यक्रमासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी एकत्र फोटोसेशन केलं. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फोटोशुटसाठी एकत्र आले. दोघांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
दरम्यान अंबादास दानवे यांच्या फोटोसेशनसाठी ठाकरे आणि शिंदे एकत्र आल्याचे दिसून आले.मात्र, ठाकरे आणि शिंदे यांनी एकमकांच्या शेजारी बसणं टाळलं. उद्धव ठाकरेयांना एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसण्याचा आग्रह नीलम गोर्हे यांनी केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिंदेच्या बाजूला बसणं टाळलं. तर यावेळी एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्याकडे कानाडोळा केला. दोघे आजूबाजूला उभे राहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. फोटोसेशनदरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये केवळ एका खुर्चीचा अंतर होता. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नीलम गोर्हे बसल्या होत्या.
विधानसभेत शिंदेंनी केलेल्या टिकेला प्रत्यूत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले‘ माझे वडिल आणि आजोबांची परिस्थिती कशी होती, त्यांना माहित आहे. ज्यांना त्या सोन्याच्या चमच्यांनी भरवलं. त्यांनी त्याच अन्नाशी प्रतारणा केली. हे पाप जनता विसरू शकणार नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.


Comments