top of page

विमान अपघाताचा पहिला व्हिडीओ शूट करणार्‍या तरुणाची चौकशी


अहमदाबाद येथील विमानाच्या भिषण अपघातानंतर सोशल मिडियावर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एअर इंडियाचे विमान नागरी वस्तीच्या अतिशय जवळून जाताना आणि त्यानंतर तेथे कोसळताना स्पष्ट दिसते. हा व्हिडिओ एकदम अचूक वेळेला रेकॉर्ड करण्यात आला. अपघात इतक्या अचूकवेळी कसा रेकॉर्ड करण्यात आला असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. याच पार्श्वभूमिवर व्हायरल व्हिडिओ रेकॉर्ड करणार्‍या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.


विमानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करणार्‍या तरुणाचे नाव आर्यन आहे, तो नुकताच गावावरुन अहमदाबादला त्याच्या नातेवाईकांकडे आला होता. त्याने अनावधाने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमुळे विमान दुर्घनेची दाहकता जगासमोर आली. विमानतळावरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात ही दृश्य कैद झाली. पण आर्यनने काढलेला व्हिडिओ अगदी जवळून रेकॉर्ड केल्याचे म्हटले जात आहे. आर्यनला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याच्या कारणाचा तपास पोलिस करणार आहेत.


आर्यनने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये घटनेबाबत माहिती दिली. फक्त उत्सुकतेपोटी व्हिडीओ रेकॉर्ड केला. विमान जवळून जात असल्याचे गावातील मित्रांना, लोकांना दाखवायचे होते म्हणून व्हिडीओ काढला असे आर्यनने म्हटले आहे. विमानाचा स्फोट झाला, त्यानंतर त्याने व्हिडीओ रेकॉर्ड करणे बंद केले. स्फोटामुळे तो घाबरला अशी माहिती आर्यनच्या बहिणीने दिली.


दरम्यान चौकशीसाठी आर्यनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्या नातेवाईकांच्या घरी आर्यन होता, त्यांनी आणि त्यांच्या शेजारच्यांनी आर्यनला चौकशीसाठी बोलावण्याच्या प्रतिक्रिया दिली आहे. आर्यन नुकताच गावावरुन आला होता. त्याच्यासाठी विमान पाहणे नवीन होते, कुतूहलापोटी त्याने व्हिडीओ काढला असे त्यांनी म्हटले आहे.


Comments


bottom of page