विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं; पहिला दिवस वादळी,लोकसभा पाच वेळा तहकुब! संसदेत विरोधक बाहेर कॉक्रोच पार्टी आंदोलन
- Navnath Yewale
- Jul 20
- 2 min read

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला आहे. संसदेत विरोधी पक्षांनी तर संसदे बाहेर कॉक्रोज जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थकांनी सरकारला घाम फोडला. संसदेच्या पावसाळी अधिवेनाला आज (दि.20) जुलैपासून वादळी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. नीट पेपर लिक प्रकरण आणि केंद्रीय शिणिमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम होते. त्यांची मागणी त्यांनी लावून धरली होती. या गदारोळामुळे लोकसभा आज 5 वेळा तहकुब करावी लागली. तर राज्यसभा पूर्ण दिवसासाठी तहकुब करण्यात आली.
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी हा प्रश्न लावून धरला होता. अध्यक्षांनी विरोधकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. पण त्याचा काही एक फरक विरोधकांवर पडला नाही. अध्यक्षांच्या आवाहनानंतरही गदारोळ न थांबल्याने कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. असे एकदा नाही तर तब्बल पाच वेळा लोकसभा तहकुब करावी लागली शेवटी अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत विरोधकांनी अध्यक्षांसमोर येऊन घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे प्रश्नकाळ आणि शून्यकाळचे कामकाज होऊ शकले नाही.
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना सभागृहाची प्रतिष्ठा राखण्याचे आवाहन केले. “ घोषणबाजीने संसदेची मर्यादा राखली जात नाही, तर्कशुन्य चर्चा करा,” असे बिर्ला म्हणाले. मात्र गदारोळ न थांबल्याने त्यांनी पहिल्यांदा बैठक दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केली. दुपारी 12 वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले. त्यानंतर ही विरोधकांचा आक्रमक पणा कमी झाला नव्हता. त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. विरोधकांनी ‘ न्याय दो’ आणि ‘ धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’ अशा घोषणा दिल्या. विरोधक प्रचंड आक्रमक झालेले दिसले. ते आपल्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे सरकार समोर ही पेच निर्माण झाला होता.
पीठासीन सभापती दिली सैकिया यांनी विरोधकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. विरोधक एकीकडे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतचा प्रश्न मांडत होते. शिवाय शिक्षण मंत्र्यांवर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. त्याच वेळी पीठासीन सभातपी मात्र देशातील पूरस्थितीवर चर्चा करण्याचे आवाहनक रत होते. मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. यानंतर दुपारी 12:30, 1:00 आणि 2:00 वाजता अशा सलग पाच वेळा लोसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. त्यानंतर संसदेबाहेर ही मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधक सभागृहात तर कॉक्रोच पार्टी आणि त्यांचे समर्थक रस्त्यावर आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यानुसार सरकार बॅकफूटवर आल्याचे चित्र होते. त्याच वेळी धर्मेंद्र प्रधान यांना ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चेला बोलावून घेतले होते.



Comments