top of page

वैभव सूर्यवंशीने आयपीएल मध्ये रचला इतिहास..

35 चेंडूत 11 षटकारांसह शतक ठोकले , अनेक विक्रम मोडले.



वैभव सूर्यंवशीने आयपीएलमध्ये पदार्पण केले तेव्हा तो किती प्रतिभावान खेळाडू आहे हे स्पष्ट झाले. तो एक पॉवर हिटर म्हणून ओळला जातो आणि गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातही तेच दिसून आले. पॉवर प्लेमध्ये वैभवने गुजरातच्या गोलंदाजांना चकवा दिला. त्याने वयाच्या 14 व्या वर्षी (आयपीएल 2025) आयपीएलमध्ये शतक ठोकून हितहास रचला आहे. वयाच्या 14 व्या वर्षी टी-20 शतक ठोकणे, हा एक विश्वविक्रम आहे, जगातील इतर कोणत्याही खेळाडूला हे करता आलेले नाही.


त्याच्या डावाच्या दुसर्‍या चेंडूनवर 90 मीटरचा षटकार मारल्यानंतर सूर्यवंशीने मागे वळून पाहिले नाही आणि एक ऐतिहासिक आयपीएल विक्रम रचला. सूर्यवंशीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत हंगामातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याने फक्त 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या आयपीएलमध्ये तिसरा सामना खेळताना वैभव सूर्यवंशीने ही कामगिरी केली. या हंगामात निकोलस पूरनने हैदराबाद विरुद्ध 18 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. पण सूर्यवंशीने हा विक्रम क्षणार्धात मोडला.

वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी अर्धशतकात त्याने 6 षटकार आणि 3 चौेकार मारले. वयाच्या 14 व्या वर्षी तो आयपीएल मध्ये अर्धशतक करणारा पहिला खेळाडू ठरला. कदाचित इतर कोणताही फलंदाज वर्षानुवर्षे हा विक्रम मोडू शकणार नाही. 210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने चांगली सुरवात केली.


वैभव सूर्यवंशीने शतकासह विक्रम मोडला

अर्धशतक ठोकल्यानंतर सूर्यवंशी अधिक आक्रमक झाला आणि त्याने षटकारांचा पाऊस थांबू दिला नाही. शेवटी, त्याने 35 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारांसह शतक ठोकून नवा इतिहास रचला. भारताकडून आयपीएलमधील हे सर्वात जलद शतक आहे. एकूण यादीत, गेलेले 30 चेंडूत शतके केले होते. सूर्यवंशी आता आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. शतक ठोकल्यानंतर तो बाद झाला आणि निघून गेला पण, जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर त्याच्या नावाची सर्वत्र प्रशंसा झाली. त्याने 38 चेंडूत 11 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णाच्याा चेंडूवर तो बाद झाला.


Comentarios


bottom of page