(व्हिडिओ): नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला भोंदूबाबा ‘कॅप्टन’खरातची घोषणाबाजी पोलिसी खाक्यानंतर चालताही येइना, म्हणतोय ताकद राहिली नाही
- Navnath Yewale
- Mar 22
- 2 min read

नाशिक : महिला अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. चौकशीच्या आजच्या तिसर्या दिवशी पोलिसांनी खरातची चांगलीच ‘ काळजी’ घेतल्याचे दिसून आले. कालपर्यंत कोठडीतही वेगवेगळ्या क्लृप्त्या करत थेट पोलिसांनाच भविष्यवानी सांगत पोलिसांनाच ‘ तुमच्यावर कोप होईल’ असं म्हणार्या खरातची आज (22 मार्च) चांगलीच ‘काळजी’ घेतल्याचे दिसून आले. चालता येत नसताना ‘ नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणत पोलिस वाहनात बसल्यानंतर मान टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भांदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याचे समोर आले आहे. अगोदर एका महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर आता त्याविरोधात तक्रार करण्यासाठी अनेक महिला समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने तर मी गर्भवती असताना त्याने माझ्यावर अत्याचार केला, असा आरोप केला आहे. दरम्यान, आता याच अशोक खरातविरोधात लैंगिक शोषणाचा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याभोवती कारवाईचा फास अधिक आवळला जात आहे. असे असतनाच आता पोलिसांच्या चौकशीच्या फेर्यात अडकलेला हा खरात पुरता घायकुतीला आला आहे. चौकशीनंतर त्याच्यात त्राण राहिलेले नाहीत. तो ढसाढसा रडत आहे. त्याला चालताही येत नसल्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार भोंदू अशोक खरातवर आज (22 मार्च ) तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये खरातने एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धर्मिक विधी आणि भविष्याच्या नावाखाली त्याने माझे शोषण केले आहे, असा अरोप पिडित महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. ही तक्रार दाखल होताच आता अशोक खरात हा आणखी अडचणीत सापडला आहे.
दरम्यान, अशोक खरातवर असलेल्या आरोपांची चौकशी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केली जात आहे. त्याच्या चौकशाचा हा सलग तिसरा दिवस आहे. अशोक खरातची शनिवारी (21 मार्च) तब्बल सात तास चौकशी झाली. त्यावेळी एसआयटी पथकाच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते उपस्थित होत्या. या चौकशीत खरातची मालमत्ता, आर्थिक व्यवहार, जमीन खरेदी., महिलांशी संबधित आरेाप याविषयी खरातला विचारण्यात आले. आज (22 मार्च) पुन्हा एकदा खरातची कसून चौकशी करण्यात आली.
या चौकशीनंतर मात्र खरात पुरता हतबल झाल्याचे दिसले. त्याच्यात त्राण उरलेला नव्हता. पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर अशोक खरात ढसाढसा रडल्याचे सांगितले जाते. तसेच कधी काळी तंत्र-मंत्राची शक्ती असल्याचा दावा करणारा हा खरात मात्र पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर माझ्यात ताकद राहिलेली नाही, असे म्हणत आहे.
त्याला चालताही येत नसल्याचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. हा व्हिडिओ पाहून नाशिकचे पोलिस अशोक खरातची चांगलीच ‘ काळजी’ घेत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.



Comments