top of page

शरद पवार राज्यसभेवर जाणारच!,दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?

मुंबई : राज्यसभेची निवडणूक जाहिर झाली असून याच महिन्यातील 16 तारखेला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी ही निवडणूक होत असून महायुतीकडे 6 आणि महाविकास आघाडीकडे 1 जागा आहे. त्यामध्ये, भाजपला 4 आणि शिंदेच्या शिवसेनेला 1 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाणार आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार याचं नाव निश्चित झालं आहे. तर, भाजप आणि शिंदेच्या शिवसेना उमेदवारांची प्रतिक्षा आहे. दुसरीकउे महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्ष आग्रही असल्याचे पाहायला मिळालं. त्यात, संख्याबळ अधिक असल्याने शिवसेना आणि काँग्रेसच जास्त आग्रही होती. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी पुन्हा एकदा शरद पवचार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.


राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवार यांच्या नावावर तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये एक मत होत असल्याची माहिती आहे. मागील दोन आठवड्यापासून महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या एका जागेवरून मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. त्यातच आता शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या नावावर महाविकास आघाडीमध्ये एकमत होताना पाहायला मिळत आहे. राज्यसभेसाठी शरद पवारांची पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केल्याने याव सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंसह दिल्लीमधील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. जर दिल्लीतील काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देत असतील तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे महाविकास आघडीमध्ये शरद पवारांचं नाव राज्यसभेचे उमेदवार म्हणून निश्चित होत असल्याचे समजते.


भाजपकडून कोणाची नावे जाहिर होणार? :

राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्ष आपले उमेदवार निश्चित करत आहेत. भाजपकडून आजच 6 राज्यातील 9 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आली नाहीत. दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडूनही कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. दरम्यान, मविआकडून तिन्ही पक्षांमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी रस्सीखेच सुरू असताना शरद पवारांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे, शरद पवार पुन्हा दिल्लीत जाण्यास आग्रही असल्याचे दिसून येते.


राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुक:

राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत. तामिळनाडूतून 6,बिहार आणि पश्चिम बंगालमधून 5 आणि ओडिशा राज्यातून 4, असाममधून 3, तेलंगणातून 2 आणि छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमुधून प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

Comments


bottom of page