top of page

शिंदेच्या ठाण्यात शिवसेना- भाजप वाद पेटला; शिंदेच्या मंत्र्याची भाजप जिल्हाध्यक्षाने केली थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रार



महायुतीमध्ये तीनही पक्षांच्या एकमेकांविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याचे पुढे येत आहे. विशेषत: शिवसेना आणि भाजपमध्ये वर्चस्वाचा वाद सुरू झाल्याचे दिसून येत आहे. भाजपने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच त्यांची कोंडी करायला सुरुवात केल्याचे चित्र आहे. भाजपचा प्रदेशाध्यक्ष ठाण्यातील देण्यात आला आहे. त्यानंतर वनमंत्री गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार सुरू केला.त्यानंतर आता भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यसाविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे ठाण्यात शिंदे आणि त्यांच्यसा शिलेदारांची पुरती कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे स्पष्ट आहे.


ठाण्यातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्य विरोधात गंभीर आरोप केले आहेत. सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहरात केलेल्या अनधिकृत कामांची तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे.


मीरा भाईंदर भागातील चेन्ना, काजूपाडा, घोडबंदर, वर्सोवा या ठिाकणी प्रताप सरनाईक यांनी वैयक्तिक जमिनी खरेदी करून त्या जमिनींचा विकास करण्यासाठी सरकारचे आणि महापालिकेचे सुमारे दिडशे कोटी रुपये खर्च करून रस्ते आणि गटारांचे बांधकाम केल्याचा आरोप जैन यांनी मुख्यमंत्र्याकउे केलेल्या तक्राद्वारे केला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांना पाठविले आहे.


दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतिने अ‍ॅड. राजदेव पाल यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांना नोटीस पाठवली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांची 72 तासांत माफी मागा; अन्यथा 210 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोठावण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड पाल यांच्याकडून देण्यात आला आहे.

याबाबत दिलीप जैन म्हणाले की, ज्या ठिकाणी गरज नव्हती, त्या ठिकाणी रस्ता पडला आहे. त्याबाबतच्या तक्रारी माझ्याकडेे लोकांनी केल्या आहेत, त्या मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविल्या आहेत. सरनाईक यांच्याकडून नोटीस आली तर मी त्याचे उत्तर देणार आहे. माझ्याकड सर्व पुरावे आल्यानंतर मीते देणार आहे किंवा सरनाईक यांनी त्याबाबतची परवानगी घेतल्यासची कागदपत्रे दाखवावीत. मी कुठलेही बेकायदेशीर काम केले नाही, असे सांगावे. त्यानंतरच मी दिलगिरी व्यक्त करतो. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होऊ नये, यासाठीच मी माझ्याकडे आलेल्या तक्रारी मुख्यमंत्र्याकडे पाठविल्या आहेत.

Comments


bottom of page