top of page

शिक्षक पित्याने केली पोटच्या मुलीची हत्या; सराव परीक्षेत मार्क कमी पडले, पित्याच्या मारहाणीत लेकीचा मृत्यू



बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या लेकीला बेदम मारहाण केली.त्या मारहाणीत त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे.साधना धोंडीराम भोसले (वय 17)असे मृत मुलीचे नाव आहे.याप्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी खून प्रकरणी अटक केली आहे.मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिच्या आईला आपल्या पतीविरोधात पोलिसात फिर्याद देण्याची वेळ आली.


 धोंडीराम भगवान भोसले राहणार नेलकंजी येथे माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत.त्यांचे वडील भगवान भोसले त्याचं शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलीस पाटील होते.पत्नी प्रीती गावच्या माजी सरपंच तर धोंडीराम यांना मुलगा आणि साधना मुलगी अशी दोन मुले आहेत.साधना आटपाडीत बारावीचे शिक्षण घेत होती.वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती. तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती. त्यात तिला कमी गुण मिळाले, त्यामुळे वडील धोंडीराम चिडले होते. शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले? याचा जाब विचारत मारहाण केली.


त्याचवेळी मुलगी साधना हिने तुम्हालाही कमी मार्क पडले होते ना पप्पा तुम्हाला देखील चांगले मार्क पडले असतील तर डॉक्टर किंवा कलेक्टर बनला असता मुलीचा हा प्रश्न ऐकताच वडिलांना राग आल्याने घरातच असलेल्या लाकडाच्या जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली.साधनाच्या डोक्याला जबर मार लागला संपूर्ण शरीराला इजा झाली.तिला दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.पत्नी प्रीती आणि मुलांच्या सांगण्यावरून आरोपी विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आरोपीला पोलीस कस्टडी मिळाली आहे. अधिकचा तपास सुरू असल्याचे आटपाडी पोलिसांनी सांगितले.

Comentarios


bottom of page