शिक्षण विभागाचा नवीन निर्णण; शाळेची घंटी कधी वाजणार!
- Navnath Yewale
- May 28
- 1 min read

राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहेत, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा 9 जून पासून सुरू होणार आहेत. तर राज्य मंडळाच्या अंतर्गत येणार्या शाळा 16 जून पासून सुरू होणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेच्या वातावरणात परतण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरु झाली आहे. अनेक शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे. पालकही मुलांच्या शाळेसाठी लागणार्या वस्तूंची खरेदी करण्यात गुंतले आहेत.
राज्यातील विविध भागांतील हवामन व उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन शाळा सरु होण्यांच्या तारखांमध्ये फरक ठेवण्यात आला आहे. सीबीएसईच्या शाळा बहुतेक शहरी भागात असतात आणि त्यांच्या वेळापत्रकानुसार नवीन शैक्षणिक वर्ष लवकर सुरु होते. राज्य मंडळाच्या शाळा मुख्यत: ग्रामीण भागात आणि जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे त्या थोड्या उशिराने सुरू होणार आहेत.
दरम्यान, अनेक शाळांम्धये नवीन अभ्यासक्रम, उपक्रम व तांत्रिक सुविधा लागू करण्याचे काम देखील चालू आहे. काही शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम्स, डिजिटल अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. या वर्षीपासून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत काही नव्या सुधारणा लागू करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना एका नव्या पद्धतीच्या शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे.
सीबीएसईच्या शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासूनच सुरू झाले आहे. मात्र उन्हाळी सुट्टीच्या ब्रेक नंतर आता पहिले ते दहावीचे वर्ग 9 जूूनपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक वर्गाची तयारी पूर्ण झाली आहे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शाळा 16 जूून सोमवारी सुरू होणार आहेत. या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम सत्र सोमवार 16 जून ते गुरुवार 16 ऑक्टोबर 2025 असे राहील.
Comments