top of page

शिवराजला मारणारे लोक कोण, हे सुर्यप्रकाशाइतक स्पष्ट - धनंजय देशमुख पालकमंत्री अजित पवार यांच्या दौर्‍या दिवशीच परळीबंदची हाक



बीडमधील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येला (9 डिसेंबर 2024) पाच महिने पूर्ण होतात तोच परळीत घडलेल्या शिवराज दिवटे मारहाणप्रकरणाने पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरली आहे. शुक्रवारी संध्याकाळी परळीत शिवराज दिवटे या तरुणाला एका टोळक्याने अपहरण करून डोंगराळ भागात नेऊन बांबू आणि लाकडाने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.


दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आपल्याला लोखंडी रॉड आणि कत्तीने मारहाण करत ‘याचा संतोष देशमुख पार्ट 2 करायचा’ असं आरेापी म्हणत असल्याचं शिवराजनं सांगितल्यानंतर मोठी खळबळ उडाली. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी परळीत मारहाण झालेल्या शिवराज दिवटे याची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात भेट घेतली व त्याच्या प्रकृतीची विचारणा केली.


धनंजय देशमुख म्हणाले :

मारणार्‍या लोकांना भविष्याची चिंता नाही ते अज्ञानी आहेत. त्यांना ज्यांनी कुणी ह्या चुकीच्या गोष्टी करायला सांगितल्या आहेत, त्यांना प्रशिक्षण दिलं आहे , हे कालाच फोटोमधून समोर आलं आहे. हे लोक कोणासोबत राहतात, हे समोर आलं आहे. या चुकीच्या घटना कधी बंद होणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मी याबाबत बीडचे पोलिस अधिक्षक यांना भेटणार आहे. जे जिल्ह्यामध्ये घडतंय याची कल्पना साहेबांना आहे का नाही हे देखील त्यांना बोलणार आहे. असं धनंजय देशमुख म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत गंगाधर काळकुटेस इतरही लोक होते.


आम्ही शिवराजला भेटलो होतो. त्याच्या डोक्याला मार आहे. डोळेही लाल आहेत. हाताने बचाव केल्यामुळे तो वाचला आहे. तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू असे मारताना बोलत होते, असे त्यांने सांगितले, त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक आल्याने त्याचा जीव वाचला. मात्र हे सगळं बीड जिल्ह्यासाठी भयावह आहे, हे बीड जिल्ह्याचं नाव खराब करणारं आहे. बीडची तुलना बिहारशी केली जाते. अशा घटना बीडमध्ये होत आहेत. हे थांबवणे गरजचे आहे. बीडचे पालकमंत्री अणि पोलिस अधिक्षकांनी यासाठी कठोरातली कठोर पावले उचलली पाहिजेत. आरोपींना मकोका लागला पाहिजे. पोलिस अधिक्षक चांगलं काम करत आहेत. मात्र, खालची पोलिस यंत्रणा कुचकामी आहे. पोलिस दलात चुकीचे पायंडे पडलेले आहेत, ते थांबणे गरजेचे आहे. असे उपस्थितांनी सांगितले.


अजित पवारांच्या दौर्‍या दिवशीच परळी बंदची हाक,


राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड जिल्हा दौर्‍यादिवशीच परळी बंदची हाक देण्यात आली आहे. गुंडगिरीच्या निषेधार्थ सोमवारी म्हणजे आठवडी बाजारादिवशीच परळी बंदचे अवाहन करण्यात आले आहे. परळीत पुन्हा एकदा गुंडगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवराज दिवटे (वय 18) या तरुणाला शुक्रवारी उचलून रत्नेश्वर डोंगराच्या पायथ्याशी नेऊन, ‘तुझा संतोष देशमुख करतो’ म्हणत अत्यंत अमाणुष मारहाण करण्यात आली.


दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. याची नोंद घेत बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक़ करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत ंनी दिलेल्या माहितीनुसार मारहाण झालेला तरुण शिवाराज हा लिंबोटी गावचा आहे. त्याच्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलिस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील दोन विधिसंर्षग्रस्त बालके आहेत. सचिन विष्णू मुंडे, ऋषिकेश ज्ञाणोबा गिरी, रोहन उमेश वाघुळकर, सामाधान श्रीकृष्ण मुंडे व आदित्य बाबासाहेब गित्ते अशी उर्वरित आरोपींची नावे आहेत.



दरम्यान स्वत: शिवराज दिवटे याने मारहाणीच्या घटनेबाबत सांगितले, की आपण एका मित्रासोबत परळीतील जलालपूर भागात एका धार्मिक़ कार्यक़्रमासाठी गेलो होतो. तेथे काही लोकांध्ये वाद झाला. ते पाहून नंतर शुक्रवारी दुपारी 3:30 च्या सुमारास गावाकउे निघालो. रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ टाळके आधीच येऊन उभे होते. त्यांनी आपली दुचाकी अडवून उचलून नेत रत्नेश्वर डोंगराजवळ मारहाण केली. मारहाण करणारे गांजाच्या नशेत होते आणि ‘ याला सोडू नका’ याचा संतोष देशमुख करूअसे म्हणून कत्ती , लोखंडी रॉड, बांबूने मारहाण केली. दारूची बाटलीही डोक्यात घातली. नजीकच्या दोन व्यक्ती मदतीसाठी धावून आल्या त्यांनी मारहाण करणार्‍यांना पिटाळून लावले.


संतोष देशमुख करायचा म्हणून शिवराज दिवटेला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांना मोक्का लावण्यात यावा. कायद्याची जबर बसावी, या प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस अधिक्षक़ांची भेट घेणार आाहोत. पोलिसांचा काही भाग भागात वचक राहिला नाही असे राजेसाहेब देशमुख म्हणाले.


शिवराज दिवटे हल्लाप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सात जणांना ताब्यात घेतले आहे. यातील दोन जण विधिसंघर्षग्रस्त बालके आहेत. या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु आरोपी हे मराठा, वंजारी, बौद्ध, गोसावी व माळी समाजाचे आहेततून कोणत्याही जातीतील संघर्ष स्पष्ट होत नाही. त्यामुळे जातीय रंग देऊ नये से पोलिस अधिकक्षक नवनीत कॉवत म्हणाले.

Comments


bottom of page