शिवराज दिवटे मारहाण प्रकरण; मराठा संघटना आंदोलनावर ठाम, आज अजित पवारांचा दौरा
- Navnath Yewale
- May 19
- 2 min read

किरकोळ कारणावरुन 20 जणांनी मिळून परळी तालुक्यातील शिवराज दिवटे या तरुणाला काठ्या, बेल्ट, रॉडने बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. मारहाणी प्रकरणानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी बीड बंदची हाक दिली होती. मात्र, रविवारी रात्री उशीरा बीड बंद स्थगित करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले. मात्र, परळी बंद ठेवण्याचे अवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांकडून करण्यात आले. मराठा संघटना परळीमध्ये आंदोलन करण्यावर ठाम आहेत. त्यातच आज पालकमंत्री अजित पवार आज जिल्हा दौर्यावर आहेत.
शविराजला मारहाण करणार्या सात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये दोन अल्पवयीन तरुणांचा देखील समावेश आहे. बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणाला जातीय रंग देऊ नका, असे आवाहन केले आहे. 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे आरेापी आहेत. हे तत्कालीन कारणामुळे हे भांडण झाले असल्याचे दखील त्यांनी सांगितले.
शिवराजला मारहाण केल्या प्रकरणी मनोज जरांगे पाटील, आमदार सुरशे धस हे देखील आक्रमक झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. रविवारी मनोज जरांगे पाटील आणि सुरशे धस यांनी शिवराजची रुग्णालयात भेट घेत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.
धनंजय मुंडेनी घेतली भेट :
शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाला मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष भडकण्याची शक्यता वर्तवली जात असताना माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी शिवराजची रुग्णालयात भेट घेतली. अंबाजोगाईतील रुग्णालयात शिवराजची अस्थेवाईकपणे चौकशी करतानाच धनंजय मुंडे त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असा शब्द दिला.
दिपक केदार यांचा घनाघात:
दिपक केदार यांनी रविवारी शिवराज दिवटे यांची भेट घेवून प्रकृृती बाबत विचारणा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना दिपक केदार यांनी परळी , अंबाजोईत घडणार्या घटनांबाबत तिव्र संताप व्यक्त केला. पालकमंत्री अजित पवार बीड येण्यापूर्वीच चार दिवस आगोदर अशा घटना का घडतात? मागील वेळेस आजित पवार बीडल येण्यापूर्वी चार दिवस आगोदर अंबाजोगाईत अशी घटना घडली, त्यानंतर आताही चार दिवस अजित पवार बीडला येण्यापूर्वी परळीत ही घटना घडली.
जनता दुधखूळी नाही अजित पवार यांनी पोलिस अधिक्षकांची बदली करावी आणि या झुंडशाहीला मोकळं रान मिळावं असा यामागचा उद्देश आहे. संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारांना भिती निर्माण व्हावी यासाठी हे उद्योग सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. बीड जिल्ह्यातील पोलिसांनी पोलिस अधिक्षकांना एकट पाडण्याचा प्रयत्न चालवला आहे.
आमची मागणी आहे की, पोलिस अधिक्षकांनी परळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निलंबीत करावं. पोलिस अधिक्षक याच्या जातीचा रंग देवून नये या वक्तव्यावर दिपक केदार म्हणाले की संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला मॉडीफाय करुण हे प्रकरण घडवलं आहे. जेणे करून जातीवर हे प्रकरण येवू नये आणि घटनाही घडून जावी अशा पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
Comentários