शिवसेना(ठाकरे) पक्षाला आताच युतीचा पुळका कसा? - संदीप देशपांडे
- Navnath Yewale
- Jun 20
- 1 min read

मनसे- शिवसेना ठाकरे गट युती हा आमचा एकमेव विषय नाही राज ठाकरे हे योग्यवेळी युतीबाबत निर्णय घेतील. पण अचानक युतीसाठी इतका उत्साह का? उद्धव ठाकरेंचे 60 आमदार निवडून आले असते तर आमचा विचार केला असता का? असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज- उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. संदीप देशपांडे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी देशपांडे यांनी ठाकरे गटाला प्रश्न करत इशारा दिला आहे.
गेल्या काही वर्षापासून राज- उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा होत आहे. ठाकरे बंधु एकत्र आल्यास राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज जाणकार वर्तवत आहेत. ठाकरे गट शिवसेनेच्या वर्धाप दिनाच्या मेळाव्यात बोलताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले. यामुळे राज- उद्धव युती होण्याच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत.
ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याने राज्यात नवीन राजकीय वारे वाहतील अशी चर्चा सुरू झाली. मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या एका विधानमुळे मात्र युतीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अचानक ठाकरे गटाला युतीचा पुळका का आला? युतीबाबत इतका उत्साह आता का? असे प्रश्न संदीप देशपांडे यांनी केल्यानं युतीच्या शक्यतेवर वादाचे ढग दाटलेत. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याबाबत अध्यादेश लागू करण्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे.
Comments