शेतकरी कर्जमाफी योजनेत कोणत्याही कठोर अटी व शर्ती लादलेल्या नाहीत - मुख्यमंत्री फडणवीस
- Navnath Yewale
- Jun 12
- 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित पत्रकार परिषदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफी, हवामान बदल शेतीसमोरील आव्हानांवर सविस्तर भूमिका यावेळी त्यांनी कर्जमाफीतील अटींबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देत सरकारची भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले की, शेती क्षेत्रासमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे भविष्यात ‘क्लायमेट प्रूफ’ शेतीकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. याचबरोबर सरकारने जाहीर केलेल्या कर्जामाफी योजनेत कोणत्याही कठोर अटी किंवा शर्ती लादलेल्या नसल्याचेही फडणवीस म्हणाले.
कर्जमाफीतीलएकमेव अट स्पष्ट करताना त्यांनी म्हटले की, राज्यातील जिल्हा सहकारी बँकांसह संपूर्ण बँकींग व्यवस्था संकटात येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या निर्णयाचा लाभ 40 लाखांहून अधिक शेतकर्यांना विनाअट मिळणार आहे. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी विशेष मंतिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांचा समावेश आहे.
अंमलबजाणीदरम्यान उद्भवणार्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी या समितीकडे देण्यात आली आहे. यावेळी फडणवीस यांनी या निर्णयामागे कोणत्याही राजकीय हेतू नसल्याचा दावा केला.“ 2029 च्या निवडणुका लळात ठेवून 2028 मध्येही कर्जमाफी जाहीर करता आली असती. मात्र आम्ही शेतकर्यांच्या हिताचा विचार करून आत्ताच हा निर्णय घेतला,“ असे ते म्हणाले. राज्यातील शेतकर्यांना सक्षम बनवणे हा सरकारचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



Comments