शेतकरी चिंतेत : हमीभाव खरेदी केंद्राची प्रतिक्षा; अडचणी वाढल्या, उत्पादित शेतीमाल माल कवडीमोल दरात विकण्याची वेळ
- Navnath Yewale
- Nov 2
- 1 min read

निसर्गाच्या अवकृपेने खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच, शासनाकउून हमी भावाने माल खरेदी करणारी केंद्रे (सीसीआय आणि नाफेड) सुरू होण्यास विलंब होत असल्याने शेतकरी बांधवांना आपला उत्पादित माल नाईलाजाने कमी दरात आडत बाजारपेठेत विकावा लागत आहे.
दरवर्षी दिवाळीच्या आसपास सुरू होणारी खरेदी केंद्रे यंदा नोव्हेंबर उजाडला तरी सुरू झालेली नाहीत. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे उत्पादन घटले आहे. अशा परिस्थितीत, हमी भावात माल विकल्यास रब्बी हंगामासाठी बियाणे आणि खते घेण्यासाठी थोडा आधार मिळाला असता. आज रोजी येथील आडत बाजारपेठेत कापूस 7150 रुपये क्किंटल तर सोयाबीन 4425 रुपये प्रति क्किंटल दराने खरेदी करण्यात आले. हा दर शासनाच्या हमीभावापेक्षा कमी आहे.
दरम्यान, शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीसाठी बियाणे व खत खरेदी करण्यासाठी नाइलाजाने आपला कापुस, सोयाबीन कमी दरात विक्री करत आहेत. त्यामुळे आता शासनाच्या खरेदी केंद्रांना कधी मुहूर्त मिळणार, याची शेतकर्यांना प्रतिक्षा आहे. जेणेकरून त्यांना आपल्या मालाला योग्य भाव मिळू शकेल.



Comments