शेतकर्यांना आधार: राज्यातील 21 लाख शेतकर्यांना 1,356 कोटी रुपयांचे वाटप
- Navnath Yewale
- Oct 18
- 1 min read

मागील पंधरवाड्यात राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यातील 21 लाख 66 हजार शेतकर्यांना 15 लाख 16 हजार 681 कोटी 30 लाख 22 हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तसेच जुलै व ऑगस्ट 2025 या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 19 लाख 22 हजार 909 शेतकर्यांना 15लाख 45 हजार 250.05 हेक्टरवरील शेतीपिकाच्या नुकसानीपोटी 1 हजार 339 कोटी 49 लाख 25 हजारांच्या मदतीसही मान्यता देण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरीत होणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले.



Comments