शेतकर्यांनो सावधान पेरणीची घाई नकोच !
- Navnath Yewale
- May 25
- 2 min read

शेतकर्यांनो सावधान पेरणीची घाई नकोच !
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे यंदा मे महिन्यातच वरुनराजाने राज्यभरात जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी वर्ग पेरण्या उरकून घेण्याच्या तयारीत आहे. मात्र, कृषी विभागाने शेतकर्यांना सावधानतेचा इशारा दिला असून हंगामपूर्व पेरणी केल्यास पिकांवर किडरोगांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असल्याने (5 जून) नंरतच पेरण्यांना सुरुवात करावी, असे अवाहन कृषी विभागाच्या वतिने करण्यात आले आहे.
यंदा 2025 सालचा नैऋत्य मोसमी पाऊस वेळेपूर्वीच म्हणजे 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. ही बाब अत्यंत महत्वाची ठरणार आहे, कारण सामन्यत: दरवर्षी मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये पोहोचतो यंदा तीन दिवस आधी मान्सून येणार असल्याने हवामन खात्याने दिलेली ही माहिती शेतकरी आणि पावसावर अवलंबून असलेल्या उद्योगांसाठी आशेची किरण घेऊन आली आहे.
महाराष्ट्रातील नागरिक, विशेष: शेतकरी बांधव सध्या मान्सुनच्या प्रतीक्षेत आहेत. सामान्यत: महाराष्ट्रात मान्सून 7 जूनच्या आसपास दाखल होतो. मात्र यंदा केरळमध्ये 27 मे रोजी मान्सुन दाखल होणार असल्यामुळे महाराष्ट्रातही पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. हवमान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार 4 ते6 जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रात पाहचू शकतो. त्यामुळे राज्यातील शेतकर्यांनी खरीप हंगामासाठी अवश्यक तयारी सुरू केली असून सध्या सर्वदूर कोसळत असलेल्या पावसामुळे बी-बियाण्यांची खरेदी, जमिनीची मशागत आणि सिंचन नियोजनात शेतकरी वर्ग व्यस्त आहे.
राज्यात सर्वदूर सरासरी 100 मी.मी. पाऊस झाला असून तो पेरणीसाठी समाधानकारक आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने पेरण्या उरकून घेण्याची तयारीही सुरू केली आहे. मात्र कृषी विभागाने शेतकर्यांना सावधानतेचा इशारा दिला आहेसून हंगामीपूर्व पेरणी केल्यास पिकांमध्ये गोगलगायी, पैसा, खोडमाशी या किडी तर मुग, उडीद, सोयाबीन या पिकांवर पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
तन व्यवस्थापनासाठी पाळी घालूनच करा पेरणी: दरम्यान यंदा मे महिण्यात जोरदार पावसाने हजेरी लागवल्याने शेतामध्ये तण वाढणार असल्याने पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकर्यांनी तण व्यवस्थापनासाठी शेतामध्ये पाळ्या घालव्यात. शेतकर्यांनी पाळी घालून पेरणी केल्यास किड व रोगांपासून पिकांचे संरक्षण होईल, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
हंगामी पेरणी, बीजप्रक्रिया महत्वाची : शेतकरी वर्गाने हंगामी पेरणी करत असताना बियाणाला किटकनाशक व बुरशीनाशक व जैविक खते यांची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. बीजप्रक्रिया करून पेरीण केल्यानंतर पिकांचे संरक्षण होण्याबरोबर उत्पन्नातही वाढ होते.
(कृषी विभाग)
Comments