शेफाली जरीवालाचा मृत्यू अजूनही रहस्य?
- Navnath Yewale
- Jun 30
- 2 min read

‘कांटा लगा ’ गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक झालेल्या मृत्यूने मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. 27 जून रोजी रात्री 1 वाजता 42 व्या वर्षी तिचे निधन झाले. सुरुवातीच्या अहवालांनुसार, तिला ह्रदयविकाराचा झटका आला आणि तिचे पती पराग त्यागी आणि इतर तिघे जण तिला बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पण मुंबई पोलीसांच्या ताज्या निवेदनामुळे, या प्रकरात एक नवीन वळण आले आहे. हा साधा ह्रदयविकाराचा झटका होता की त्यामागे आणखी काही सहस्य आहे?
मुंबई पोलीसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे आणि ते संशयास्पद मानून फॉरेन्सिक टीमने शेफालीच्या अंधेरी येथील घराची झडती घेतली. एका पोलीस अधिकार्याने पीटीआयला सांगितले की, ‘ शवविच्छेदन पूर्ण झाले आहे, परंतु मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.’ सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की, हा नैसर्गिक मृत्यू आहे आणि कोणताही गैरप्रकार दिसून येत नाही. पोलीसांनी अपघाती मृत्यू अहवाल नोंदवला आहे आणि पराग त्यागी, कुटुंब, नोकर आणि बेलेव्ह्यू हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह आठ जणांचे जाबब नोंदवले आहेत.
शेफालीच्या अंतसंस्काराच्या वेळी पराग त्यागी पूर्णपणे विस्कळीत दिसत होता. शनिवारी संध्याकाळी ओशिवरा स्मशानभूमीत शेफालीचा अंत्यसंस्कार झाला. जिथे परागने तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन जिच्या पार्थिवाला निरोप दिला. माध्यमांशी बोलताना त्याने हात जोडून विनंती केली, कृपया संवेदनशील रहा, याला सर्कस बनवू नका. माझ्या परीसाठी प्रार्थना करा.
दरम्यान, वयाच्या 20 व्या वर्षी ‘कांता लगा’ या म्युझीक व्हिडिओद्वारे रातोरात स्टार बनलेल्या शेफालीने तिच्या उत्साहाने लाखो मने जिंकली. तिने ‘ मुझसे शादी करोगी ’ आणि कन्नड चित्रपट ‘ उडुगारू’ मध्ये काम केले. टीव्हीवर ती ‘ नच बलिये’ 5 आणि 7 बुगी वूगी आणि ‘ बिग बॉस 13’ मध्ये दिसली, जिथे सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची मैत्री चर्चेत होती. शेफालीचे पहिले लग्न 2004 मध्ये मीत ब्रदर्सच्या हरमीत सिंगशी झाले होते. जे 2009 मध्ये घटस्फोटात संपले. 2015 मध्ये तिने पवित्र रिश्ता आणि ब्रम्हराक्षस सारख्या शोमध्ये दिसणारा अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले.
हरमीत सिंग म्हणाले:
शेफालीचे माजी पती हरमीत सिंग यांनी इस्टाग्रामवर लिहिले की, “ हा माझ्या आयुष्यातील सर्वात दु:खद क्षण आहे शेफालीचे अचानक निधन माझ्यासाठी अविश्वसनीय आहे. आम्ही एकत्र सुंदर क्षण घालवले, जे नेहमीच माझ्या ह्रदयात राहतील.तिचे पालक, पारग आणि बहीण शिवानी यांच्याबद्दल माझी संवेदना. युरोपमध्ये असल्याने मी अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकलो नाही. जे माझ्यासाठी अत्यंत दु:खद आहे. तिच्या आत्म्याला शांदी मिळो.
मुंबई पोलीसांना अद्याप कोणतीही संशयास्पद हालचाल आढलेली नाही. परंतु पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण उघड होईल. दरम्यान, शेफालीचे चाहते आणि इंडस्ट्रीतील लोक सोशल मिडियावर तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. बिग बॉस 12 च्या सह -स्पर्धक शहनाज गिल, माहिरा शर्मा आणि गायक मिका सिंग यांनीही तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
Commentaires