श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराजांचा स्वत:वरच हल्ला चाकुच्या वाराने गुप्तांग छाटले; भक्तमंडळीत खळबळ
- Navnath Yewale
- Mar 15
- 1 min read

बीड: जिल्ह्यातील वारकारी संप्रदायामध्ये महत्वाचे स्थान असलेल्या श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी आज (दि.15) स्वत:वर हल्ला करून चाकुच्या वाराने आपले गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आदिनाथ महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आहिल्यानगर येथील खाजगी रुग्णलायात उपचार सुरू आहेत.
बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वत:वर वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्यांनी स्वत:चे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महंताच्या या घटनेने तारकेश्वर गडाच्या भाविकांत खळबळ उडाली आहे.
खंर तर वारकारी संप्रदायामध्ये अदिनाथ महाराज यांना मोठं स्थान आहे. बीड जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र तारकेश्वर गड या ठिाकणी ते महंत म्हणून काम पाहतात. बीडच्या आष्टी तालुक्यातील महिंदा गावात तारकेश्वर गड अध्यात्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.
दरम्यान, आज बीडच्या श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वत:च वार करून गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर गंभीर जखमी आदिनाथ महाराजांवर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मात्र आदिनाथ महाराज यांनी असे पाऊल का उचलले याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या घटनेने तारकेश्वर गडाच्या भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.



Comments