top of page

संजयगांधी निराधार लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ; नांदेडमध्ये दिव्यांग संघटनेचा जल्लोष

फटाक्यांची आतिषबाजी, पेढे भरवून आंदोस्तव; दिव्यांगांनी मानले शासनाचे आभार

ree

नांदेडमधील सकल दिव्यांग संघटनेच्या वतिने दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आदोलन,मोर्चे करण्यात आले. त्याचबरोबर हक्काच्या मानधनवाढीसह इतर मागण्यांसाठी लोकप्रतिनिधींच्या घरावर भिक मांगो आंदोलनासह विधीमंडळाच्या अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. दिव्यांगांच्या कल्याणासाठी आज शासनाने संजयगांधी निराधार लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये एक हजार रुपयांची वाढ केली. संघटनांच्या विविध आंदोलनाचे फलित म्हणून नांदेडमध्ये दिव्यांग संघटनच्या वतिने आनंदोत्सव साजरा करत शासनाचे आभार मानण्यात आले.


माणासाला माणुस म्हणून जगण्यासाठी त्याच्या गरजा महत्वाच्या असतात. गरजा भागविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती संघर्षाशी दोन हात करत असला तरी दिव्यांगांना कल्पनेपलिकडे जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. दिव्यांगांना आत्मनिर्भर होवून जीवन जगण्यासाठी शासनस्तरावरून त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, शासन,प्रशासनाचे उदाशिन धोरणं त्यांच्या मुळावर उठलं आहे. दिव्यांगाच्या सबलीकरणासाठी स्वयंरोजगारापासून आर्थीक लाभाच्या योजनांचा लाभासाठी दिव्यांगांचा कायम संघर्ष सुरू आहे. दरम्यान, दिव्यांगाच्या मानधनासह स्वयंरोजगारासाठी पंचायतराज व्यवस्थापन, लोकप्रतिनिधी कडील निधी नियमांप्रमाणे खर्च होत नसल्याने दिव्यांगांना जगण्यासाठी यातना सोसत धडपड करावी लागत आहे.

ree

मानधन वाढीसह विविध मागण्यासांठी सकल दिव्यांग सघटनेच्या वतिने कायम प्रशासन दरबारी मोर्चे, आंदोलनं प्रसंगी विद्रोही आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. हक्काच्या निधीखर्चासाठी लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा काढत भिक मांगो अंदोलन करण्यात आले. याशिवाय दिव्यांगाच्या आर्त टाहो, शासन दरबारी पोहचावा या उद्देशाने विधीमंडळाच्या अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. राज्यातील सकल दिव्यांगांच्या हक्क आणि गरजा लक्षात घेवून दिव्यांग मंत्री अतुल सावे यांनी आज संजयगांधी निराधार योजना लाभार्थींच्या मानधनामध्ये एक हजार रुपयांची वाढ केली.

ree

दिव्यांसाठी ही वाढ संजीवनी मानली जात असल्याने सकल दिव्यांग संघटनेच्या वतिने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. त्याचबरोबर शहरवासीयांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी संघटनेचे राहुल साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील, व्यंकट कदम, रवि कोकरे, सुनिल जाधव, सय्यद आरिफ, नारायण नवले, कार्तिककुमार भरतीपुरम, आतिक हुसेन, शेख आलिम, शेख मुबीन, महमंद मोसिन, प्रशांत हणमंते, शेख माजिद, शेख ताज, शेख हसन, सनिल कांबळे, शेख मतिन आदींसह मुकबधीर-कर्णबधीर शेकडो दिव्यांग उपस्थित होते.

Comments


bottom of page