top of page

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी; वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या आर्जावर आज निर्णयाची शक्यता!



मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज (24 जून) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होकणार आहे. मागील सुनावणी दरम्यान न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची देखील उपस्थिती राहणार आहे.


या प्रकरणात वाल्मिक कराडसह अन्य आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या घटनेतील आरोपी कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. मागील सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात आरोप निश्चितीसाठी पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याने आरोप निश्चिती करण्यात यावी, असा अर्ज न्यायालयात सादर केला होता. दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल पुरावे मिळाले नसल्याचे न्यायालयात नमूद केले. तसेच कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज देखील न्यायालयात सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबरच कराडच्या संपत्ती जप्ती बाबत सरकरी पक्षाकउून युक्तिवाद होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी आज न्यायालय नेमका काय निकाल देतं हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.



दरम्यान, आजच्या सुनावणीत आरोपीच्या प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी अर्ज दिला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. आज त्याचा निकाला लागणार आहे. आरेापीने निर्दोष मुक्तीचा जो अर्ज दिला आहे त्याची देचील आज सुनावणी होईल. शिवाय आजच्या तारखेला चार्ज देखील फ्रेम हाईल. आजच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम उपस्थित राहणार असल्याचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीड येथील विशेष मकोका न्यायालयात होणार आहे. 17 जून रोजी न्यायाधीश रजेवर असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.


बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले असता, त्यांनी विराज देशमुखच्या शिक्षणासची जबाबदारी घेतली होती. त्यानुसार आता विरोज देशमुख हा सांगली जिल्ह्यातील रेठेधरण येथील सैनिकी शाळेमध्ये शिक्षण घेणार आहेत. याबाबतेच पत्र वर्षा निवास्थानी झालेल्या बैठकीत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार तसेच सदाभाऊ खोत यांची देखील उपस्थिती होती.

Comments


bottom of page