संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जरांगे पाटील यांचा मोठा दावामला त्या पापात सहभागी व्हायचं नाही - जरांगे पाटील
- Navnath Yewale
- Jun 5
- 1 min read

मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून आवाज उठवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता या प्रकरणामध्ये कानाला हात लावले आहेत. संतोष भैय्याचं प्रकरण दाबलं जात असून मला त्या पापात सहभागी व्हायचं नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. पुण्यात मराठा समाजाच्या बैठकीसाठी आलेल्या जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मी प्रामाणिक आहे, उद्या जर मी मेलो तर वर जाऊन संतोष भैय्या मला, हे काय केलं? असं विचारल नाही पाहिजे. त्यामुळे मला पापात सहभागी व्हायचं नाही. हा मॅटर सरकारने पूर्णपणे संपवून टाकला आहे. या प्रकरणांमध्ये सर्वांना सहआरोपी करणं अवश्यक होतं. मात्र ते प्रकरण पूर्णपणे दाबण्यात आले आहे. कोर्टामध्ये आरोपींच्या वकिलांनी आरोपींना मकोकातून मुक्त करा, अशी मागणी केली. त्यावर सरकारी वकिलांनी देखील याला आमची काहीच हरकत नसल्याचे सांगितल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
या प्रकरणामध्ये जितके मला प्रामाणिक प्रयत्न करायचे हाते, तितके मी केले आहेत. त्यासाठी मागे हटलो नाही. मात्र आता या प्रकरणांमध्ये जर देशमुख कुटुंबाने आपल्याला सांगितलं, तरच लक्ष घालणार आहे. तसेच मकोका हटवण्याच्या बाबतीत देशमुख कुटुंबांनी आक्षेप घेतला की नाही, हे देखील आपल्याला माहित नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले.
देशमुख कुटुंबीयांनी घेतली भेट:
शहरातील चांदणी लॉन्स येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. संताष देशमुख यांच्या केस बद्दल सद्यस्थिती जाणून घेत जो पर्यंत संताष भैय्याल न्याय मिळत नाही तो पर्यंत सरकारला सुट्टी नाही असा निर्धार करण्यात आला. यावेही संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगा विराज देशमुख, वैभवी देशमुख यांच्यासह मस्साजोग येथील देशमुख कुटुंबीय उपस्थित होते. समाज पाठीशी राहणार अस
Comments