top of page

संभाजीनगरमध्ये कुत्र्याने चोरट्यांचा केला करेक्ट कार्यक्रम; साडेपाच लाखांची चोरी उघड





छत्रपती संभाजीगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एका श्वानाने दहा दरोडेखोरांचा पर्दाफाश केला आहे. आठ ते दहा दरोडेखोरांनी एका घरावर दरोडा टाकून कुटुंबीयांना बेदम मारहाण केली होती. यावेळी आरोपींनी घरातील साडेपाच लाखांच मुद्देमाला लंपास केला होता. अपरात्री आलेल्या चोरट्यांनी हा कांड केल्याने पोलिसांकडे कसलाही पुरावा नव्हता. मात्र एका श्वानामुळे दरोड्याचा छडा लावणं पोलिसांना सोपं गेलं.


याप्रकरणी वाळूज पोलिसांनी सात अरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे संबंधित श्वानाने सात ते आठ किलोमिटर अंतर कापून दरोडेखोरांचा छडा लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील टोकी शेत शिवार वस्तीवर राहणार्‍या भीमराव शेजवळ आणि कारभारी शेजवळ या शेतकर्‍यांच्या घरावर आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकत धुमाकूळ घातला होता.


दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबीयांना बेदम मारहाण करत त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने तसेच रोख रकमेसह 5 लाख 47 हजार रुपयाचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी वाळूंज पोलिस ठाण्याता गुन्हा दाखल करण्यात आला होता. छत्रपती सीांजीनगर गुन्हे तपास करीत असताना श्वान पथकाच्या सरस मदतीने दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.


दरम्यान, डॉग अ‍ॅडमिन टिपूने घटनास्थळापासून तब्बल सात ते आठ किलोमीटर अंतर कापून आरोपी यांचे सिंधी सिरसगाव गाठून आरोपीचा ठाव ठिकाणा शोधला. यानंतर पोलिस प्रशासनाने दरोडा टाकणार्‍या सात आरोपींना जेरबंद केले. सातही आरेापी एमआयडीसी वाळूंज पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास एमआयडीसी वाळूंज पोलिस करत आहेत.

Comentários


bottom of page