संभाजीब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक
- Navnath Yewale
- Jul 13
- 4 min read
अक्कलकोट येथील घटना,शिवप्रेमींकडून संताप; संभाजी ब्रिगेडच्या वतिने तीव्र निषेध

संभाजी ब्रिगेडचे नेते प्रीवीण दादा गायकवाड हे आक्कलकोट येथील नियोजित कार्यक्रमासाठी येत असतात त्यांच्या तोंडाला काही तरुणांनी काळे फासले. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महारजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आक्षेप शिवधर्म फाऊंडेशनचा होता. तसेच स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख केल्याचा राग कार्यकर्त्यांच्या मनात होता. शिवधर्म चे कार्यकर्ते अगदी आक्रमक पद्धतीने गायकवाड यांच्या अंगावर चालून गेले. त्यांच्या अंगावरील कपडे फाडण्याचाही भडकलेल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला.
संभाजी ब्रिगेड आक्रमक
काही अविचारी तरुणांनी प्रवीण दादा गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले. त्यांच्याकडे महापुरुषांचा कोणताही विचान नसल्यामुळे त्यांनी हे कृत्य केले. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि वाटेल तशी त्यांच्या विचारांची मांडणी करायची हे अतिशय बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणत्याही महापुरुषांचा विचार कोणी मोडून तोडून मांडण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेडने त्याला जशास तसे उत्तर दिले आहे, आताही दिले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद यांनी दिला आहे.
संभाजी ब्रिगेड महापुरुषांच्या विचारांचा वारसा यापुढेही चालविण्याचा प्रयत्न करेल. अशा हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही. अक्कलकोटमधील त्यातरुणांना कदाचित संभाजी ब्रिगेडच्या विचाराचा अंदाज नसल्यामुळे आणि काही अविचारी लोकांच्या विचारांच्या सानिध्यात राहून ते तरूण बिघडले असल्यामुळे प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरील त्यांनी शाई फेकण्याचा अनाठायी प्रयत्न केला आहे, असेही आनंद काशील म्हणाले.
प्रविण दादा गायकवाड यांच्यावरील शाईफेकीच्या कृत्याचा संभाजी ब्रिगेडने निषेध व्यक्त केला. संभाजी ब्रिगेडच्या विचारांनी आतापर्यंत समाजामध्ये झालेले प्रबोधन आणि जनजागृती याचा अभ्यास अविचारी कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे. या पुढच्या काळातही संभाजी बिगेड महापुरुषांच्या विचारांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी काशीद म्हणाले.
प्रविण दादा गायकवाड हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. संभाजी ब्रिगेड नावाच्या संघटनेच्या माध्यमातून सत्यशोधक विचार पुढे नेण्याचे काम ते करतात. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर कार्यकर्ते तसेच उद्योजक घडविण्याचे काम गेली अनेक वर्षे ते करीत आहेत. पुरोगामी चळवळीत काम करताना राजकारणातही ते सक्रीय आहेत. काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष अशा पक्षांच्या माध्यमातून संसदीय राजकारणात प्रवेश करण्याचे त्यांनी प्रयत्न केले. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तरुणांचे मोठे संघटन प्रवीण दाद गायकवाड यांनी उभे केले आहे. तरुणवर्गही मोठ्या प्रमाणात प्रवीण दाद गायकवाड यांचा समर्थक आहे अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडाच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजात अनेक उद्योगपती घडवले आहेत.
माझ्या हत्तेचा कट:
माझ्या हत्येच कट केला गेला होता, माझ्यावर तसा हल्ला केला गेला होता. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले यांच्यामुळेच आज मी जीवंत आहे.
अमोल मिटकरी संतापले :
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदाद गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी जो हल्ला केला त्या हल्ल्याचा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून निषेध व्यक्त करतो. प्रशांत कोरटकर वेळी हे हल्लेखोर कुठे होते? असा सवाल आमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
शिवरत्न शेटे यांच्याकडून सपत्नीक सत्कार
अक्कलकोटमध्ये शाई फेकच्या घटनेनंतर प्रवीण दादा गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आहे. शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी त्यांचा सत्कार केला. झालेल्या घटनेच्या विषयावर आत्ताच बोलणार नाही. योग्यवेळी प्रत्यूत्तर दिल्यानंतर आम्ही आमची भूमिका आपल्यासमोर मांडतो असे शेटे म्हणाले. दरम्यान संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या डोळ्याची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी डॉ. शिवरत्न शेटे यांच्या हॉस्पीटलला आले आहेत.
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत : प्रशांत जगताप
बहुजन चळवळीतील कार्यकर्ते आणि सभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा सराकर पुरस्कृत आहे असा थेट आरोप शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आला आहे. सरकारने तातडीने आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुण्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असताना सोलापूर पोलिस काय करत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कृत्यामागील मास्टरमाईंड पोलिसांनी शोधावा - रोहित पवार
बहुज समाजात अनेक उद्योगपती घडवणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करणार्या विकृतीचा जाहिर निषेध. शिव-फुले-शाहू- आंबेकडकर यांचा विचार समाजात रुजवण्याचं खूप मोठं कार्य प्रवीणदादा गायकवाड यांच्या हातून होत आहे.
अभ्यासाच्या बळावर त्यांनी अनेकांना उघडं पाडण्याचं काम केलं म्हणून तर समाजकंटकांनी त्यांच्याशी अशा प्रकारे गैरकृत्य केलं नाही ना? याचाही तपास झाला पाहिजे असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. तसंच हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे हे उघड आहे. त्यामुळं या भ्याड कृत्यामागील मास्टरमाईंडचाही पालिसांनी शोध घ्यावा. आम्ही सर्वजन प्रवीण दाद गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत असंही रोहित पवार म्हणाले.
ज्यांना विचारांचा समाना विचारांनी करता येत नाही त्यांचे असे विकृत कृत्य : विकास लवांडे
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या भ्याड शाईफेक हल्ल्याचा तीव्र निषेध. प्रवीण दादांनी शिव-फुले- आंबेडकर यांचा विचार समाजात रुजवण्यासाठी आणि बहुजन समाजात अनेक उद्योगपती घडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. त्यांच्या अभ्यासाच्या बळावर त्यांनी अनेकांचे मुखवटे उघडे पाडले आहेत अणि हिच खरी चीड आहे ह्या विकृतांना आजवर कोरटकर, छिंदम, कोश्यारी, सोलापूरकर, दानवे अशा अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यांच्या विरुद्ध लिखाण केले आणि त्यावर गप्प बसणारे हे अशा हल्ल्यांना खतपाणी घालत आहे. हे हल्लेखोर कोणी शिवप्रेमी किंवा शिभक्त नसून गुंडाची टोळी आहे ज्यांना विचारांचा सामना विचारांशी करता येत नाही ते असे विकृत कृत्य करतात.
या भ्याड कृत्यामागे कोण आहे , कोणत्या पक्षाशी संबंधित आहे याचाही तपास झाला पाहिजे. मास्टरमाईंडचा पर्दाफाश होणं आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी व्यक्त केले. पुरोगामी विचारांचा आवाज दाबण्यासाठी सरकार ‘जनसुरक्षा कायदा’ वापरतं आणि आता विचारवंतांवर हल्ले होत आहे हे त्याच साखळीतील पाऊल आहे. सरकारने तात्काळ या विकृतीचा, या गुंडांचा व यांच्या मागे असणार्या सूत्रधारांचा बंदोबस्त करावा. प्रवीण दादा आम्ही तुमच्या सामगत खंबीरपणे उभे आहोत असंही विकास लवांडे म्हणाले.



Comments