top of page

संयम पाहू नका, आता सुट्टी नाही; मागे हाटत नसतो - जरांगे पाटील


सर्व मागण्यांची आंमलबजाणी घेतल्या शिवाय आता मुंबई सोडायची नाही, आंदोलन मात्र शांततेत असेल. शेवटी बैठक आणि लढाही अंतिम असणार आहे. मराठ्यांचा संयम पाहू नका, अता सुट्टी नाही, मागे हटत नसतो म्हणत जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा सकरकारला इशारा दिला आहे.


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट ला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. सोशल मिडियावर ‘चलो मुंबई ’ चा नारा देत जागृती करण्यात येत आहे. शिवाय नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर उद्या (29 जूलै) आंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठकीचे अयोजन करण्यात आले आहे. महिनाभरा पासनू सोशल मिडीयाद्वारे या बैठकीची जागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर गाव खेड्यांमधे बैठकांच्या माध्यमातून नागरिकांना राज्यव्यापी बैठकीची माहिती देण्यात येत आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी आयोजीत केलेल्या राज्यव्यापी बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आंतरवाली सराटी येथे शनिवार (28 जूलै) पासूनच वाहनांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे या राज्यव्यापी बैठकील मोठा जनसमुदाय गोळा होणार असल्याचे चित्र आहे. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण लागू करावे, हैद्राबाद संस्थानचं गॅजेट, सातारा संस्था आणि बॉम्बे गव्हरमेंटच गॅजेट लागू करण्यात यावं, सगेसोयरे आंमलबजावणी करण्यात यावी, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मयतांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी समाविष्ट करून घ्यावे, आंदोलना दरम्यान राज्यभरात मराठा बांधवांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे यासह इतर मागण्यांवर जरांगे पाटील ठाम आहेत.

Comments


bottom of page