top of page

सत्ताधारी आमदारावरच न्यायासाठी याचनेची नामुष्की!

सावकाराने आदिवासी कर्जदार महिलेची मुलगी कर्जापाई राजस्थानात विकल्याचा आरोप




कर्ज फिटत नसल्याने बुलढाण्यात एका अवैध सावकाराने आदिवासी मुलीला राजस्थानमध्ये विकल्याचा आरोप करण्यात आला. सावकारा विरोधात कठोर कारवाईसाठी दस्तुर खुद्द सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदारानेच पत्रकार परिषदेतून याचना केली आहे. बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे) गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेतून सावकारावर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.


शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते बुलढण्याचे आामदार संजय गायकवाड यांनी शनिवारी (दि.21) पत्रकार परिषदेतून अवैध सावकारावर गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली.


दरम्यान, सावकराकडून आदिवासी बांधवांसह महिलांवर होत असलेला त्राच व जाचाची माहिती दिली. विशेष म्हणजे आमदार संजय गायकवाड याच्या पक्षाचे राज्यात सरकार आहेत. गृहमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांचेच आसताना न्यायासाठी एका सावकारावर कारवाईसाठी थेट पत्रकार परिषदेतून याचनेची वेळ सत्ताधारी आमदारांवर आल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. आमदार गायकवाड यांनी आयोजीत पत्रकार परिषदेतून सावकारावर गंभीर आरोप केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


कर्ज फेडता आले नाही म्हणून अवैध सावकारीचा धंदा करणार्‍या सावरकारान चक्क कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकायला लावल्याचा खळबजनक आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. शिवाय, काल परवा सावकाराने एका 12 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग केला. बुलढाणा जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहूल गावामध्ये सुनील बुरड या अवैध सावकारीच्या जोरावर उन्माद करत असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला.


राज्यात अवैध सावकारीच्या माध्यमातून शेतकरी, मजूर व गोरगरिबांना त्रास दिला जात असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. अनेकदा अशा प्रकरणात बड्या व्यक्तींना पोलिस अधिकार्‍यांना हाताशी धरुन सावकार आपली पोळी भातज असतात. त्यामुळे, अवैध सावकारकीचा धंदा मांडलेल्यांना वेळीच आळा बसत नाही, किंवा त्यांच्यावर कारवाईचा बडगाही आहेत. महाराष्ट्रात अनेक शेतकर्‍यांच्या बायका पैसे मिळाले नाहीत म्हणून सावकाराने गहाण ठेवल्या आहेत. अनेक ठिकाणी सावकराने व्याजाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून शेतकर्‍यांच्या बायकां, मुलींवर अतिप्रसंग केल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.


सावकारी कायद्याचा गैरवापर करून उन्माद केला जात आहे, आम्ही या प्रकरणात उच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ. या आदिवासी गावात सावकार शेतकर्‍यांच्या शेती हडप करत आहेत. जो सावकार पैशासाठी मुलीला विकायला लावतो, अशा सावकाराची मस्ती सरकारने उतरवावी या बाबत मी विधानसभेत आवाज उठवणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्री यांना विनंती आहे की, या प्रकरणात शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावामध्ये सुनील बुरड या अवैध सावकाराचं नाव घेत त्याच्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

Comments


bottom of page