top of page

ससूनच्या अहवालावर सुप्रिया सुळे संतापल्या ; म्हणाल्या तो अहवाला जाळून टाकावा




पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचाराअभावी काही दिवसांपूर्वी गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर या प्रकरणाची चौकशी वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे. आता या प्रकरणावर ससून रुग्णालयाच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. मात्र, हा अहवाल समोर आल्यानंतर त्या अहवालात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लिन चिट देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.


दरम्यान, ससून रुग्णालयाच्या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या आहेत. ससून रुग्णालयाच्या समितीच्या अहवालावर बोलताना तो अहवाल जाळून टाकला पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.



गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकणासंदर्भात ससून रुग्णालयाच्या अहवाला ंसदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “ मला विश्वासच बसत नाही की असा काही अहवाल येऊ शेकतो? खर तर मी प्रशांत जगताप (राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते) यांनी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाबाबत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचं कौतुक करते. तसेच मी त्या अहवालाचा निषेध करते” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.


मला असं वाटतं की तो अहवाल जाळून टाकला पाहिजे, कोणाच्या तरी घरातील एक लेक गेली, मुलांची आई गेली आहे. मग एवढा चुकीचा अहवाल कसा येऊ शकतो? हे धक्कादायक आहे, असंवेदनशील आहे. आम्ही तो अहवाल स्वीकारणार नाही. मला असं वाटतं तो अहवाल (ससून रुग्णालयाच्या समितीचा अहवाल) कचर्‍याच्या डब्यात नाही, तर तो अहवाल जाळून टाकला पाहिजे. जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Comentarios


bottom of page