top of page

साई मंदिरात हार, फुल, प्रसाद नेण्यास बंदी युद्धाच्या पार्श्वभुमिवर आजपासून अंमलबजावणी





शिर्डीच्या साईबाबा संस्थानला काही दिवसांपूर्वी धमकीचा मेल आल्यानंतर साई संस्थान अलर्ट झाले आहे. तर सद्यस्थितील भारत- पाकिस्तान युद्ध सुरू असल्याने शिर्डी साई संस्थानकडून कडक तपासणी केली जात आहे. तर आता दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना मंदिरात हार, फूल आणि प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी आजपासुन सुरू करण्यात आली आहे.


शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी हजारोच्या संख्येने रोज भाविक येत असतात. अशा ठिकाणी सुरक्षिततेची दखल घेतली जात असते. अशातच काही दिवसांपूर्वी आलेला धमकीचा मेल आणि आता भारत व पाकिस्तानमध्ये असलेले तणावाचे वातावरण यामुळे मंदिरातील सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रवेशद्वारावरच भाविकांची तपासणी करण्यात येत आहे.

मंदिरात हार, फुल, प्रसाद नेण्यास बंदी

दरम्यान भारत-पकिस्तान तणाव आणि साई संस्थानला आलेल्या धमकीच्या मेलनंतर साई संस्थानने काही कडक निर्णय घेतले आहेत. यामध्ये साई मंदिरात येणार्‍या प्रत्येक भाविकांनी कडक तपासणी करण्यात येत आहे. तर आता मंदिरात भाविकांना हार, फुल व प्रसाद नेण्यास बंदी करण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.


सुरक्षेच्या दृष्टीने कडक तपासणी

सुरक्षेच्या दृष्टीने साई संस्थान अलर्ट झाले आहे. दरम्यान आजपासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आल्याने सकाळपासून येणार्‍या भाविकांजवळील फुल, हार व प्रसाद जमा केला जात आहे. पुढील आदेशापर्यंत भविकांना मंदिरात हार, फुल, प्रसाद नेता येणार नाही.यासह भाविकांकडील कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण समाधी मंदिरात जाणार नाही;याची दक्षा घेतली जात आहे. यात काही भाविक संस्थामधील कर्मचार्‍यांशी वाद घालताना दिसून येत आहेत.

Comentários


bottom of page