साकूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील जनाबाई जानू कामडी सेवानिवृत्त
- Navnath Yewale
- Jul 31
- 1 min read
निरोप समारंभात आठवणींना उजाळा; सेवाकार्याने उपस्थित भारावले

जव्हार : तालुक्यातील साकुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्तव्यदक्ष आरोग्य सेविका जनाबाई जानू कामडी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एक भावनिक व तालुक्यातील आरोग्य अधिकारी, स्थानिक नेते मंडळी बळवंत गावित, दादाशेठ तेंडुलकर सन्माननीय यांच्या समवेत कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमात जनाबाईताईंनी कामडी आपल्या सेवाकाळातील आठवणी उजाळा देत उपस्थितांचे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांच्यासोबतच्या सांगत अनुभव. आठवणी डोळे पानावले तसेच मन जिंकले. ३० वर्षांहून अधिक काळ ग्रामीण आरोग्यसेवेत त्यांनी कार्यरत राहून आदिवासी भागातील महिलांना आरोग्य सेवा स्तनदा माता, कुपोषणा विषयी, लहान मुला आरोग्य विषयी, तसेच कोरोना काळात केलेले कार्य ग्रामीण भागातील जनता कधीही विसरणार नाही पुरवण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांचा अनुभव, शांत स्वभाव व कार्यतत्परता यामुळे त्या नेहमीच सर्वांमध्ये लोकप्रिय राहिल्या.
या कार्यक्रमास आरोग्य विभागातील तालुका अधिकारी डॉक्टर किरण पाटील , स्टाफ नर्स , आरोग्य सेवक, आशा वर्कर, इतर आरोग्य कर्मचारी सहकारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, आणि साकुर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन केंद्रातील कर्मचारी राजेश कदम यांनी केले तर आभार साकुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सदानंद काशीदे यांनी मानले. जनाबाईताईंना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.



Comments