top of page

साखरेचा भाव गगनाला: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! भाववाढीला जाबाबदार कोण?, इथेनॉल धोरण का साठेबाजी?

छत्रपती संभाजीनगर: आधीच माहागाईने मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना गोड साखरेच्या भाववाढीचा धक्का बसला आहे. साखरेच्या किरकोळ दराने 70 रुपये टप्पा गाठल्याने सर्वसामन्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे. त्यामुळे साखरेच्या भाववाढीला नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न आता सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.


साखर महागली की, केवळ घरातीलच चहाचा खर्च वाढत नाही, तर साखरेचा वापर होणार्‍या विविध खाद्यपदार्थांच्या किमतीवरही त्याचाव अप्रत्यक्ष परिणाम होतो. चहा, मिठाई, मोदक, लाढू, पेढे, जिलेबी, गुलाबजामून, श्रीखंड, बासुंदी, बिस्कीटे, केक, पेस्ट्री, ब्रेड तसेच विविध बेकरी पदार्थ महागण्याची शक्यता वाढते. विशेषत: सणासुदीच्या काळात गोड पदार्थांची मागणी वाढत असताना साखरेच्या दरवाढीचा आर्थिक फटका सामान्य कुटुंबांवर पडू शकतो.

साखरेच्या दरवाढीमागे मागणी- पुरवठ्यातील तफावत, साखर उत्पादनातील घट, बाजारातील उपलब्ध साठा, उत्पादन खर्च आणि इतर विविध घटक कारणीभूत असू शकतात.


त्याचबरोबर इथेनॉल निर्मितीसाठी ऊस व सायरेच्या उत्पादनातील काही भागाचा वापर होत असल्याने त्याचा साखरेच्या उपलब्धतेवर आणि दरावरप कितपत परिणाम होतो, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे इथेनॉल धोरणाचा साखरेच्या बाजारभावावर नेमका किती परिणाम झाला, याचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे गरजेचे आहे.


बाजारातील साठेबाजी आणि कृत्रिम टंचाईच्या चर्चेमुळेही साखरेच्यवा वाढत्या दरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर काही व्यापार्‍यांकडून अनावश्यक साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असेल, तर त्याचा थेट फटका ग्राहकांना बसतो. त्यामुळे शासनाने व्यापार्‍यांच्या साठ्याची तपासणी, साठवणूक मर्यादेचे पालन आणि बाजारातील उपलब्ध साखरेच्या साठ्याची पारदर्शक माहिती जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. साखरेच्या दरवाढीचा प्रश्न केवळ ग्राहकांपुरता मर्यादित नाही.


ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने, इथेनॉल निर्मिती, व्यापारी, सरकार आणि ग्राहक अशा संपूर्ण साखळीशी साखरेचे अर्थकारण जोडलेले आहे. शेतकरी ऊस उत्पादनासाठी खर्च सहन करतो, तर ग्राहक महाग साखर खरेदी करतो. मग या संपूर्ण साखळीमध्ये वाढत्या दराचा फायदा नेमका कोणाला होतो, याचे पारदर्शक उत्तर आता सरकारने जनेतेसमोर ठवेणे गरजेचे आहे.

Comments


bottom of page