top of page

सिंधुदुर्गात छत्रपतींच्या नव्या पुतळ्याची प्रतिष्ठापना

वादळांसह कुठल्याही वातावरणात 100 पुतळा टिकण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची हमी !




सिंधुुदुर्गातील मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर राज्यभरातून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. शिवाय पुतळ्याच्या दर्जावरून राजकारणही चांगलेच तापले होते. शिवभक्तांच्या संतापाची लाट पाहून सरकारने लवकरच पहिल्यापेक्षा उत्तम आणि दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानुसार आज सिंधुदुर्गातील मालवण किल्ल्यावर छत्रपतींचा नवा पुतळा दिमाखात उभा राहिला आहे.


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सुतार साहेबांनी उत्तम पुतळा तयार केला आहे. जर वादळं आली, त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आला आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळा अनावरण सोहळ्या प्रसंगी बोलताना दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, ही आमच्यासाठी समाधानाची बाब असून त्याच तेजाने आणि स्वाभिमानाने हा पुतळा उभा झाला आहे. मालवण किल्यावर दुर्दैवी घटना झाल्यानंतर विक्रमी वेळेत पुन्हा हा पुतळा प्रस्थापित करू शकलो. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो. शिवेंद्रराजे भोसले आणि रविंद्र चव्हाण यांच्या काळात काम वेगाने झालं.


आयआयटीचे अभियंते आणि जे.जे महाविद्यालयातील शिल्पकार हे पुतळा घडवताना सोबत होते. त्यामुळेच, जरी वादळं आली तरी त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.जवळपास 93 फूट उंच हा पुतळा असून 10 फुटाचा चबुतरा देखील आहे. विशेष म्हणजे देशातला सर्वात उंच पुतळा देखील हा आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात पुतळा टिकेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


पुतळ्याच्या मेन्टेन्सची जबाबदारी पुढील 10 वर्षासाठी कंत्राटदार यांच्याकडेच असेल. आम्ही निर्धार केला होता कुठल्याही परिस्थितीत महराजांना साजेसा पुतळा उभारू तो पूर्ण झाला आहे.


वादळातही पुतळा टिकेल - शिल्पकार सुतार

पुतळा कोसळल्यानंतर नेमका तो का पडला असेल यांची कारणं शोधली आणि त्यानंतर ह्या पुतळ्याची उभारणी केल्याचे शिल्पकार अनिल सुतार म्हणाले. या आधिच्या पुतळ्यात फक्त लोखंडाचा वापर करण्यात आला होता.ज्यामुळे त्याला 3-4 महिन्यांत जंग लागला.


त्यामुळे, ह्या पुतळ्याची उभारणी करताना आम्ही ब्राँझ, झिंकसारख्या धातूंचा वापर केला आहे. हेच धातू आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची निर्मिती करताना देखील वापरत आहोत. अशात, दिर्घकाळ हा टीकावा असं नियोजन केल्याचे अनिल सुतार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. दरम्यान, महाराजांच्या पुतळ्याची उंची 60 फूट आहे, एकून पुतळ्याची उंची तलवारीपर्यंत 93 फूट आहे. सोबतच चबुतरा 10 फूटाचा आहे असेल्याची माहितीही त्यांनी दिली.

Comments


bottom of page