top of page

सीजेपीचं ठरलं; सप्टेंबरपासून ‘क्या बोलती पब्लिक’ राष्ट्रव्यापी कँपेन बेरोजगारी भारतातला मोठा मुद्दा, अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीच्या केंद्रीय कमिटीची छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी दोन दिवसीय बैठक संपन्न झाली. बैठकीतील निर्णयाबाबत गुरूवारी (दि. 6) अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर हल्लाबोल केला.


छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत अभिजीत दिपके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या सरकारला राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. गेल्या 14 वर्षात देशाने दडपशाही आणि हुकूमशाही पाहिली आहे. परंतु, आता लोकांच्या मनातील भिती संपली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोक आता यांना घाबरत नाहीत


आजच्या काळात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज होते. आपल्या देशातले शिक्षण सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे आहे. आम्हाला देशातल्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची आहे. लोकांचा सर्वात जास्त राग देशातल्या मिडीयावर आहे. 60 टक्के लोक 35 वयाच्या खालचे आहेत. कोर्टात जाऊन पक्षही फोडले जात आहेत. सामान्य लोकांना न्यायालयात तारीखही मिळत नाही. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे, बेरोजगारी हा भारतातला सर्वात मोठा मुद्दा आहे. डिलिव्हरी बॉय होण्याचे कोणत्याच युवकाचे स्वप्न नसते. जंतरमंतरवर विद्यार्थीच नव्हे तर बेरोजगार होते असे अभिजीत दिपके यावेळी म्हणाले.


पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, सीजेपी नेमकी काय आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, त्यांच्या विचारावर चालणारी ही पार्टी असणार आहे. जी संविधानाची विचारधारा आहे तीच आमची विचारधारा आहे. आम्ही सेक्युलर आहोत, लोकशाहीवर भरोसा ठेवतोय असे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके म्हणाले.


कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दोन दिवसांच्या चर्चेनंतर आता आपला पुढचा प्लान जाही केला आहेश. सीजेपी यास वर्षी सप्टेंबरमध्ये ‘ क्या बोलती पब्लिक’ नावाने एक राष्ट्रव्यापी कँपेन सुरू करणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश देशभरातील लोकांच्या आकांक्षा, अपेक्षा आणि चिंतेला जवळून समजणे आणि संवाद स्थापित करणे हा आहे. आम्ही देशभरात दौरा करणार आहोत, लोकांच्या समस्या आणि अडचणी समजून घेणार आहोत. शिक्षण आणि बेरोजगारी याबद्दल कोणी बोलत नाही, संसदेत कोणी बोलत नाही. सरकारला तर असं वाटते की हा मुद्दा नाही. सरकार फक्त एकच मुद्दा आणते तो म्हणजे हिंदू आणि मुस्लिम असेही दिपके म्हणाले.


बेरोजगारी हा भारतातला सर्वात मोठा मुद्दा : आजच्या काळात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज होते. आपल्या देशातले शिक्षण सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे आहे. आम्हाला देशातल्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची आहे. लोकांचा सर्वात जास्त राग देशातल्या मीडियावर आहे. कोर्टात जाऊन पक्ष फोडले जातात.समान्य लोकांना न्यायालयात तारीखही मिळत नाही, लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. जंतरमंतरवर विद्यार्थीच नव्हे तर बेरोजगारही होते असंही दिपके म्हणाले.

Comments


bottom of page