सीजेपीचा जंतरमंतरवर जल्लोष; “कॉक्रोचशी पंगा घेऊ नका”; “ मराठी मोडेल, पण झुकणार नाही” - अभिजीत दिपके

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुख्य मागणीसाठी गेल्या 36 दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतिने विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. अखेर आज शनिवारी (दि.25) सीजेपी च्या आंदोलना मोठं यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान शिक्षणमंत्रीपदावरून पायउतार झाले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी आंदोलनाच्या स्टेजवरून जल्लोष व्यक्त करत आंनद साजरा केला. त्याचबरोबर आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये मोठा जल्लाष पाहायला मिळाला.
“धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, हे काय म्हणत होते की, या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, आपण करून दाखवलं” असं म्हणत जल्लोष साजरा केला.
आंदोलकांना संबोधीत करताना दिपके म्हणाले की, “ घाबरायचं नाही, लोशाही आहे, लोकशाहीत बोलायला भती वाटत असेल तर कसली लोकशाही? आवाज उठवला तरच हे लोक लाईनमध्ये राहतील, आणि यांना लाईनमध्ये ठेवणे आवश्यक आहे. वरती बादशहा समजून बसलेले लोक, आमच्यामुळे तिथे बसलेत. राजीनामा तर झालाय पण आम्ही असे जाणार नाही आमच्या आणखी दोन मागण्या आहेत”
“झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए ”:
“कॉक्रोचशी पंगा घेऊ नका” असा इशारा यावेळी अभितीत दिपके यांनी दिला. “ पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, डोकी फोडून घेतली, या देशातील विद्यार्थ्यांनी मोठं हिम्मतीचे काम केले आहे. 20 तारखेनंतर ज्या मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्या सर्व केसेस मागे घेण्यात याव्यात,” अशी मागणीही दिपकेंनी यावेळी केली. “ अशीच लोकशाही असायला हवी, हीच लोकशाही आहे.” असंही दिपके म्हणाले. “ झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए.” “ मराठी आहे मोडेल पण झुकणार नाही” असंही आंदोलक, विद्यार्थ्यांना संबोधीत करताना दिपके म्हणाले.



Comments