सीजेपी राजकीय पक्ष नाही, तर दबावगट म्हणून काम करणार- अभिजीत दिपके
- Navnath Yewale
- 5 days ago
- 3 min read

छत्रपती संभाजीनगर: काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी सीजेपीच्या केंद्रीय सदस्यांची दोन दिवसीय बैठकीचे अयोजन करण्यात आले आहे. बैठकीच्या पहिल्या दिवशी आज (बुधवार,दि. 5) सीजेपीच्या सदस्यांसह अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांसी संवाद साधला. कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष नाही तर दबाव गट म्हणून काम करणार असल्याचं अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केल्याने. कॉक्रोच जनता पार्टी राजकीय होणार का? या प्रश्नावर जवळपास पडदा पडला आहे.
झारखंड येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आम्ही जाणार असल्याची माहिती कॉक्रोच जनता पार्टीच्या वतिने पत्रकार परिषदेत देण्यात आलं आहे. देशातील जनतेचा राजकीय पक्ष, संघटना, न्याय व्यवस्था, पत्रकार यांच्यावरील विश्वास उडाला आहे. तो परत आणण्याची गरज निर्माण झाली आहे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून पुढे येण्यापेक्षा जनतेच्या समस्यांवर आवाज उठवणारा दबाव गट म्हणून पुढे यायचा प्रयत्न करणार असल्याचं अभिजीत दिपके यांनी सांगितले. दोन दिवसात होणार्या बैठकीत बेरोजगारी, देशाची अर्थव्यवस्था, इथेनॉल मिश्रित पेट्रोल अशा मुद्यांवर पुढील रुपरेषा ठरवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. संघटनेच्या बैठकीत देशभरातून जवळपास दहा ते अकरा सदस्य उपस्थित होते.
“ अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले की, दोन दिवसीय बैठकीचं अयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये संघटनेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. जंतर मंतरवर झालेलं आंदोलनं यशस्वी ठरलं. आम्हाला देशभरातून समर्थन मिळालं. त्यामुळे आता इतर राज्यांमध्ये कशा पद्धतीनं संघटनेचा विस्तार करायचा याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. दिल्लीच्या आंदोलनानंतर आमची जबाबदारी वाढली आहे. सर्वत्र संघटन कसं वाढलं पाहिजे, यासाठी या बैठकीचं अयोजन करण्यात आलं आहे. बैठकीबाबत उद्या गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधून माहिती देण्यात येणार असल्याचंही अभिजीत दिपके म्हणाले.
दरम्यान, लोकांचा राजकीय पक्ष, संघटना,न्यायालय आणि पत्रकार या सर्वांवरचा विशवास उडाला असं दिसून येत आहे. आमच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालं, नुसतं शिक्षणापुरतं नाही, तर इतर विषयांवर देखील असलेला रोष दिसून आला. हा विश्वास पुन्हा निर्माण करावा लागणार आहे आणि त्यासाठी एक दबाव गट निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजचे राजकीय पक्ष पाहिले, तर निवडून एकासोबत येतात रात्री दुसर्या सोबत दिसून येतात. एखादी व्यक्ती आमदार- खासदार म्हणून निवडणून येते एका पक्षातून, तर लगेच दुसर्या सोबत पाहायला मिळते. नाहीतर मतदार डिलीट होतात. तसं नाही झालं तर ईडी, सीबीआय पाठवून पक्ष फोडले जात आहेत. या सर्व गोष्टींमुळे जनता त्रस्त झाली आहे. म्हणूनच एक वेगळी सामाजिक चळवळ म्हणून आम्हाला जनतेनं पाठिंबा दिला असल्याचं दिपके म्हणाले.
“ आमच्या पार्टीचे प्रेरणास्थान सोनम सर असणार आहेत, ते सध्या आजारी असल्यानं त्यांना बोलवण्यात आलं नाही. कॉक्रोच जनता पार्टी ही दबाव गटाचा एक भाग म्हणून काम करणार आहे, असं अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केलं. दोन दिवस होणासर्या बैठकीमध्ये लोकांचा जो विश्वास इतर गोष्टींमुळे गमावला आहे तो कसा परत आणता येईल, त्याचबरोबर ई-20 पेट्रोल बाबत आज लोक त्रस्त आहेत, त्या संदर्भात कशा पद्धतीनं आंदोलन किंवा त्याविषयी कशा पद्धतीनं व्यक्त व्हायचं, देशातील बेरोजगारी आणि सध्या देश आर्थिक संकटात सापडला आहे, या विषयांवर आम्ही चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. झारखंडमध्ये होत असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आम्ही पूर्ण पाठिंबा दिला आहे, इतकंच नाही तर आमचे तिथले स्थानिक पदाधिकारी त्यांना आवश्यक ती मदत करत आहेत. आम्ही देखील त्या ठिकाणी निश्चित जाणार असल्याचं अभिजीत दिपके यावेळी म्हणाले.
दिल्ली आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप करण्यात येत आहेत. मात्र ज्या पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्यांच्यावर अश्रुधुरांचे नळकांडे फोडले, त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने हल्ला करण्यात आला, त्याबाबत आम्ही काय करत आहोत असा प्रश्न असल्याचं सौरभ दास यांनी उपस्थित केला, दिल्लीसह देशभरात जे आंदोलन झालं, त्यामध्ये विद्यार्थ्यांना लागणारी प्रत्येक मदत आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये कायदेशीर तज्ञांची मदत किंवा इतर गोष्टी देखील आम्ही त्यांच्यासोबत विचारपूस करून करत आहोत. कशा पद्धतीनं पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत, त्याबाबत आम्ही सरकारसोबत चर्चा करत आहोत आणि त्याचेच फळ म्हणून अनेक ठिकाणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना झालेल्या लाठी हल्ल्यात आमची एक सदस्य देखील गंभीर जखमी झाली आहे. त्यावेळी तिथे परिस्थिती नियंतणात असावी यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत होतो. भाजप आणि आरएसएस समर्थक आंदोलकांच्या खासगी गोष्टी सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते बेकायदेशीर आहे. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवई झाली पाहिजे अशी मागणीही सौरभ दास यांनी यावेळी केली.



Comments