top of page

सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी; 93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेचे सीबीएसईनं दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 चा निकाल 93.70 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी सीबीएसईच्या दहावीचा निकाल 93.66 टक्के होता. त्या तुलनेत यंदा निकालात सुधारणा झाली आहे. बोर्डानं यावेळी उत्तरपत्रिकांची तपासणी विक्रमी वेळेत पूर्ण करत निकाल दरवर्षीच्या तुलनेत एक महिना अगोदर जाहीर केला आहे.


मुलींनी मारली बाजी: दरवर्षीप्रमाणे यंदाही सबीएसईच्या दहावीच्या निकाला मुलींनी मुलांना मागं टाकत बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होणार्‍या मुलींची टक्केवारी अधिक आहे. सीबीएसईनं अधिकृतपणे टॉपर यादी जाहीर केली नाही. मात्र, गुणवत्ता प्रमाणपत्र त्या त्या विषयात अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. सीबीएसईनं दहावीचा निकाल जाहीर केल्यानं जवळपास 24 लाख 75 हजार विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे.


दरम्यान, सीबीएसई वेबसाईटवर अधिक विद्यार्थी भेट देत असल्यानं डिजीलॉकर आणि उमंग एपद्वारे विद्यार्थी तातडीनं निकाल डाऊनलोड करु शकतात. उमंग एपवरील निकालाची सर्वप्रथम सक्रिय करण्यात आली.


सीएसईनं दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला असला तरी ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश आलं आहे ते दुसर्‍या परीक्षेसाठी अर्ज दाखल करु शकतात. याशिवाय जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत मिळालेल्या गुणांमुळं समाधानी नाहीत ते 15 मे पासून सुरू होणार्‍या दुसर्‍या टप्प्यातील परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. सीबीएसईकडून लवकरच दुसर्‍या टप्प्यातील परीक्षेसाठी अर्ज मागवले जाणार आहेत. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार सीबीएसईनं दोन बोर्ड परीक्षा पद्धत आणली आहे.


सीबीएसईच्या विभागनिहाय निकाला त्रिवेंद्रम आणि विजयवाडा विभागानं बाजी मारली आहे. दोन्ही विभागांचा निकाल 99.38 टक्के लागला आहे. तर, नोएडा विभागाचा निकाल 87.66 टक्के तर दिल्ली विभागाचा निकाल 97.38 टक्के लागला आहे. केंद्रीय विद्यालयांचा निकाल 99.57 टक्के लागाला असून जवाहर नवोदय विद्यालयांचा निकाल 99.42 टक्के लागला आहे. तर सरकारी शाळांची टक्केवारी 91.43 टक्के आहे.


दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणारे विद्यार्थी: 24,71,777

उत्तीर्ण विद्यार्थी: 23,16,008

निकालाची टक्केवारी: 93.70%

परीक्षा कालावधी : 17 फेब्रूवारी ते 10 मार्च 2026

Comments


bottom of page