top of page

सुंदर दर्‍यांसाठी जगभरातील प्रसिद्ध असलेले सहा हिल स्टेशन्स !

उन्हाळ्यात ‘या’ 6 हिल स्टेशन्सना नक्की भेट द्या !





भारताला विविधतेचा देश म्हटले जाते. येथे तुम्हाला भेट देण्यासाठी अनेक ठिकाणी मिळतील. उन्हाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत, लोक सुट्टीच्या काळात सहिलीला जातात. जर एखाद्याला डोंगरावर जायला अवडत असेल, तर तो समुद्रकिनार्‍यावर जातो. तथापी, जेव्हा तीव्र उष्णता असते, तेव्हा सर्वजन डोंगरावर जातात. इथेच सुदर दर्‍या त्यांना शांती देतात.


उन्हाळ्यात गर्मीच्या वेळी पर्वतांवर सर्वाधिक गर्दी दिसून येते. अशा परिस्थितीत तुम्हाला महागाईपासून गर्दीपर्यंत, सर्व गोष्टीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे सांत्वन मिळणे कठीण होऊ शकते. बरेच लोक त्यांच्या जोडीदारासोबत प्रवासाला जातात. तर काहीजण त्यांच्या मित्रासोबत जाणे पसंत करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कमी गर्दीचे ठिकाण शोधत असाल, तर हि ठिकाणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.


झिरो व्हॅली अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशची झिरो व्हॅली केवळ दिसायलाच सुंदर नाही तर ती आणखी शांती आहे. येथील हिरवळ आणि थंड वारा जगभर प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात तेथील हवामान खूप आल्हाददायक असते. विशेष म्हणजे येथे तुम्हाला खूप कमी गर्दी दिसेल.


पब्बर व्हॅली, हिमाचल प्रदेश

पब्बर व्हॅली हे हिमाचलचे एक लपलेले सौंदर्य आहे. येथील दृश्य खूप शांत आणि आकर्षक आहे. पर्वत, सफरचंदाच्या बागा आणि जुन्या गावांमध्ये वाहणारी नदी ते आणखी सुंदर बनवते.


कौसानी, उत्तराखंड

कौसानीला भारताचे स्वित्झलर्र्ंड असेही म्हणतात. येथून बर्फाच्छादित हिमालयीन पर्वतांचे विहंगम दृश्य पाहता येते. येथील वातावरण खूप शांत, थंड आणि खूप मोहक आहे. या ठिकाणी अजिबात गर्दी नाही.


शोझा, हिमाचल प्रदेश

शोझा हे हिमाचल प्रदेशातील कुल्लुजवळील एक लहान गाव आहे. ज्यांना शांतता आणि निवांतता हवी आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण विशेष: परिपूर्ण आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग आणि जंगल फिरण्याचा आनंद घेऊ शकता.


मुन्सियारी, उत्तराखंड

उत्तराखंडमधील मुन्सियारी हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथून तुम्ही पंचचुली पर्वताच्या सौंदर्याचे कौतुक करू शकता. उन्हाळ्यातही येथील हवामान थंड राहते. जर तुम्हाला ट्रेकिंग आणि फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही इथे नक्की भेट द्यावी.


चोपटा, उत्तराखंड

उत्तराखंडमधील हे मिनी स्वित्झर्लंड म्हणूनही ओळखले जाते. हिरवीगार कुरणं, पाइनची जंगले आणि शांत वातावरण यामध्ये ते उन्हाळ्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण बनते.

Commentaires


bottom of page