सुन ले बेठा पकिस्तान, बाप हे तेरा हिंदूस्तान ‘तिरंगा यात्रे’ त मुख्यमंत्र्याची गर्जना
- Navnath Yewale
- May 15
- 1 min read

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करणार्या ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी, भारतीय जनता पक्षाने राज्यांमध्ये ‘तिरंगा यात्रा’ काढली. भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत इतर राज्यांसह ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली.
भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत ‘तिरंगा यात्रे’ चे नेतृत्व करताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरून जोरदार घोषणा दिल्या. ज्यामुळे मुंबईकर उत्साहित झाले मुख्यमंत्र्यांचा ‘हा’ नारा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यासपीठावरुन गर्जना केली आणि “ सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदूस्तान” अशा घोषणा दिल्या. या घोषणा ऐकताच ‘तिरंगा यात्रेत’ सहभागी झालेल्यांनी नागरिकांनी उत्साहाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जोर-जोरात घोषणा दिल्या.
“तुम कहीं भी छुपोगे, हम घुसकर मारेंगे”
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “ ज्या हेतून पाकिस्तानने भारतात काम केले आणि आमच्या लोकांना मारले, आम्ही ते हेतू त्या हेतूंची संपूर्ण पायाभूत सुविधा नष्ट करू. तुम्ही जिथे लपलात तिथे आम्ही घुसून तुम्हाला मारू, आम्ही तुम्हाला सोडणार नाही.” पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “ भारतीय सैन्याने ‘ ऑपरेशन सिंदूर’ राबवून पकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. आमच्या सैन्याने
दहशतवादी कसाबला प्रशिक्षण दिलेले अड्डे देखील उद्धवस्त केले.”
... तर आम्ही तोफा डागू
उपस्थितांना संबोधीत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की “ जर तिकडून गोळ्या झाडल्या तर, आम्ही येथून तोफा डगल्या जातील” ऑपरेशन सिंदूर सुरू केल्या बद्दल शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले धाडस आजपर्यंत कोणीही दाखवलेले नाही आम्हाला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिमान आहे, हा नवा भारत आहे. संपूर्ण देश पंतप्रधान आणि आपल्या सैन्यासोबत उभा आहे.
Comments