top of page

सुप्रीया सुळेंचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या



भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणार्‍या साडे सातशे मीटरचा रस्त्याची प्रचंड दूरावस्था झाली आहे. तो रस्ता काँक्रीटचा करण्यात यावा या मागणीसाठी बरामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या आंदोलनास बसल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यास आले नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांचाा निधी मिळतो. त्याबद्दल केंद्र सरकारचे अभार मानते. पण भोर तालुक्यातील श्री बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान हे अंतर जवळपास साडे सातशे मीटरचे आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दूरावस्था झाली असून तो रस्ता करण्या यावा, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही.


ही दुर्दैंवी बाब असून त्यामुळे आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाचा मार्ग अवलंबुन कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलनास बसले आहे. तसेच जोवर रस्त्याचा प्रश्न सुटत नाही.तोपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणाहून उठणार नाही. भले 30 तास का होईना,अशी भूमिका मांडत राज्य सरकारवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. लाडक्या बहिणीच्याा मतदार संघात भावाचे लक्ष नाही का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते मला माहित नाही आणि मी या ठिकाणी केवळ बनेश्वर येथील रस्त्याचा प्रश्न सुटला जाावा, या मागणीसाठी उपोषणास बसले असल्योचे त्यांनी सांगितले.

Comments


bottom of page