top of page

सुशील केडिया यांच कार्यालय खळखट्याक; मनसे कार्यकर्त्यांना अटक


मुंबईतील व्यवसायिक सुशील केडिया यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलीसाीं टक केली आहे. राज्यात हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरू असताना सुशील केडिया यांनी आपण मराठी शिकणार नाही असे सोशल मिडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते. मात्र, यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुशील केडिया यांचे मुंबईतील कार्यालय फोडले. याप्रकरणी मनसेच्या पाच कार्यकर्त्यांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.


राज्यात मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांनी मराठी बोलण्यास नकार देणार्‍या मिरा भाईंदर येथील एका व्यापार्‍याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक राजकीय नेते आणि हिंदी भाषिक लोकांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमिवर सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना आव्हान देत मराठी शिकणार नसल्याचे सांगितले.“ राज ठाकरे याची नोंद घ्या की, मी मुंबईत गेल्या 30 वर्षापासून राहतो. पण मला मराठी व्यवस्थित बोलता येत नाही. आता तुमचे यासंदर्भातले बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पणच केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोला” अशी पोस्ट सुशील केडिया यांनी केली.


दरम्यान, सुशील केडिया यांची पोस्ट पाहून मनसे कार्याकर्त्यांचा संताप अनावर झाला, आणि कार्यकर्त्यांनी आज सुशील केडिया यांच्या मुंबईतील वरळी येथील सेंच्यूरी बाजाराजवळील वीवर्क कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मनसेच्या पाच कार्यर्त्यांना अटक करण्यात आली.

Comments


bottom of page