स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांचे बिगूल वाजले! बुधवार पासून आचारसंहिता, 15 डिसेंबरला जिल्हा परिषदेसाठी मतदान; वळसे पाटलांनी तारीखच केली जाहिर
- Navnath Yewale
- Nov 2
- 1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव-शिरुर च्या वतिने आयोजीत मेळाव्यात दिलीप वळसे पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, नगरपरिषदेची निवडणुका सुरू असतानाच जिल्हापरिषच्या निवडणुका जाहिर होतील. माझी जी माहिती आहे त्या माहिती प्रमाणे साधारपणाने 15 डिसेंबरला जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहिर होतील. 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीचे मतदान होईल.
पाच नाव्हेंबरला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील, असा अंदाज दिलीप वळसे पाटील यांनी केला. पाच नोव्हेंबरला बुधवार आहे म्हणजे त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू होईल. प्रथम नगर परिषदांच्या निवडणुकां पार पडतील, या निवडणुका सुरू असतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होइल असंही वळसे पाटील म्हणाले.
महायुतीचा स्वबळाचा नारा : महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढणार की महायुतीत याची चर्चा सुरु आहे. मुंबई महापालिकेसाठी महायुती होईल आणि अतरत्र महायुतीमधील पक्ष स्वतंत्र लढतील अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांची ही ताकद आहे. जर तेथे युती केली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीतील पक्ष घेतील. त्यामुळे तेथे आम्ही स्वतंत्र लढू असंही फडणवीस म्हणाले. स्थानिक समिकरणानुसार युती करायची की नाही याचा निर्णय महायुतीमधील स्थानिक पातळीवरचे नेते घेणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.



Comments