top of page

स्पेशल चार्टर्ड, एनआयए चे अधिकारी, कमालीची गुप्तता तहव्वूर राणाला भारतात कसं आणलं.





मुंबई 26/11 दहशतवादी हल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात आलं आहे. तब्बल 17 वर्षांनी तहव्वूर राणाला भारतात आणले गेले. एनआयचे आयजी बत्रांच्या नेतृत्वात विशेष पथकाने तहव्वूर राणाला भारतात आणले. आता तहव्वूर राणाचा एनआयए मुख्यालयात चौंकशी होणार आहे. मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला 2009 साली अमेरिकेत अटक करण्यात आली होती. आता त्याला अमेरिकेतून भारतात आणण्यात येणार आहे. तहव्वूर राणाला अमेरिकेहून एका विशेष चार्टर्ड विमानाने नवी दिल्लत आणण्यात आले. त्याचा अमेरिकेतून भारतात आणण्याचा प्रवास अत्यंत गुप्त ठेवण्यात आला.


मिळालेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणाला अमेरिकेतील मियामी येथून एका बिझनेस जेटमधून नवी दिल्लीला आणण्यात आले. हे विशेष विमान ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील एका विमान चार्टर कंपनीकडून भाड्याने घेण्यात आले होते. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे 2:15 वाजता या विमानाने मियामीहून उड्डाण केले. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता हे विमान रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे पोहोचले. यानंतर सुमारे 11 तासांच्या विश्रांतीनंतर, गुरुवारी सकाळी 6:15 वाजता हे विमान नवी दिल्लीसाठी रवाना झाले. त्यानंतर आज सायंकाळी 6022 वाजता ते दिल्लीतील पालम विमानतळावर लँड झाले.


या विशेष मोहिमेसाठी गल्फट्रॅम जी 550 हे विमान वापरण्यात आले. हे विमान लांब पल्याच्या आणि आरामदाय इंटीरियरसाठी ओळखले जाते. 2013 मध्ये तयार झालेले हे विमान अल्ट्रा लाँग रेंज, मिड- साईज श्रेणीतील आहे. या विमानाच्या खिडक्या अंडाकृती असल्याने त्याची वेगळी ओळख आहे. या अलिशान विमानात जास्तीत जास्त 19 प्रवासी बसू शकतात. यामध्ये 9 मोठ्या सोफा-कम-बेड सीट आणि 6 स्लीपिंग बेड्सची सोय आहे. याव्यतिरिक्त, या विमानात वायलेस इंटरनेट, सॅटेलाईट फोन आणि तसेच आधुनिक मनोरंजन प्रणाली यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.



अमेरिकेच्या न्यायालयाने तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. यानंतर भारत सरकारसाठी ही कारवाई अत्यंत महत्वाची आणि संवेदनशील होती. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित ठेवण्यासाठीच या विशेष चार्टर्ड विमानाचा वापर करण्यात आला. आता भारतात तहव्वूर राणाची चौंकशी कशा प्रकारे केली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments


bottom of page