top of page

स्वकीयांकडूनच जरांगे पाटीलांना लक्ष!

मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला काय फायदा झाला?, वर्षभरात केवळ 310 प्रमाणपत्र मिळाले. हैद्राबाद गॅझेटचा जीआर निघाला असला तरी अद्याप अंमलबजावणी नाही. त्यामुळे मराठा समाजाचे हक्काचे ईडब्ल्यू एस आरक्षण कसे गेले आणि मराठा समाजाचे नुकसान कसे झाले हे अगदीच पटवून सांगण्यापासून जरांगे पाटील यांना त्यांच्या खासगी जीवनापासून महाकाळा-अंकुशनगर (जि. जालना) येथील घर, सासरवाडी अगदी पत्नी, मुलांकडील मोबाईलपर्यंत बोट दाखवून लक्ष करण्यासाठी आता स्वकीयांनीच आहेर मोडल्याचे चित्र दिसून पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. वस्तु


राज्यातील मराठा समाजास आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवलीसराटी (जि. जालना) येथून उपोषणाचे अस्त्र उपसून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले. आंतरवली च्या उपोषणापूर्वी मराठा आरक्षण मागणीसाठी जरांगे पाटील यांचा लढा सन 2002 पासून सुरू होता. मात्र या आंदोलनाला धार मिळाली ती आंतरवाली सराटीमधील आंदोलनाने. उपोषण, लाठीचार्ज, तीव्र आंदोलनामागे जरांगे पाटलांचा त्याग, चानक्षपणा, कौशल्य यासह शाररिरीक झिज असे मोठे योगदान राहिले हे सर्वश्रूत आणि सुर्यप्रकाशा एवढे सत्य आहे.


पहिल्या टप्प्यातील मुंबई आंदोलनामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेवून आरक्षणाचे अश्वासन दिले. सक्षम अंमलबजावणीठी राज्यभरात नोंदी शेाधण्यासाठी शिंदे समिती गठीत करण्यात आली. शिंदे समितीच्या कार्यवाहीमुळे मराठा समाजाच्या जुन्या नोंदी आहेत हे प्रथम समोर आलं.प्रशासनाकडून जिल्हा, तालुकास्तरावर नियंत्रणकक्षाद्वारे सुरुवातीच्या काळात युद्ध पातळीवर जवळपास 52 लाख नोंदी शोधण्यात आल्या. प्रशासनाच्या चौकशी, पडताळणीच्या चाळणीतून पहिल्या टप्प्यात राज्याभरात लाखो प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यामुळे प्रमाणपत्रधारक मराठा कुटुंब ओबीसीत गेले. हे सत्य नकारुन चालणार कसे.?



आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरात नोंदी मिळून आल्याने मराठा- कुणबी एकच असल्याचे लाखो पुरावे समोर आले. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीच्या आधारे राज्यभरातील मराठा समाज कुणबी आहे, त्यामुळे मराठा समाजास सरसकट आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी दुसर्‍या टप्प्यात 2 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईत सातारा गॅझेट, बॉम्बे गव्हरमेंट गॅझेट, कोल्हापूर, औंध संस्थानचे गॅझेटचे अश्वासनासह हैद्राबाद गॅझेटचा जीआर मिळाला हे आंदोलनाचे फलितच.!


राहिला विषय हैदराबाद गॅझेटच्या जीआरचा किती फायदा, किती तोटा? , हा नोंदी शोधण्यापासून प्रमाणपत्र मागणी प्रस्ताव, प्रशासकीय व्यवस्थेची उदाशिनता, तांत्रिक अडचणींचं भेेंडोळे यास कारणीभूत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. समाजासाठी त्याग केला, समाजासाठी हे केलं ते केेलं असं म्हणत जरांगे पाटील यांना लक्ष करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने समाजाला काय मिळालं, काय मिळायचं राहिलं, काय मिळायला हवं, काय मिळत नाही आणि का मिळत नाही हे सगळं समाजाला मिळवून देण्यासाठी समाजसेवकांचा सर्वोतोपरी प्रयत्नच समाज हिताचे ठरणार आहेत.


मधल्या काळात जरांगे पाटील यांच्या कथित घातपाताच्या प्रकरण समोर आलं. यामध्ये पोलिस तपासा, एसआयटी चौकशीतून सत्य समोर येणार आहे मात्र त्यास विलंब लाणार हे हि तितकच खरं. मात्र, स्वकीय समाजिक कार्यकर्त्यांकडूच जरांगे पाटील यांना लक्ष केलं जात आहे, यामध्ये चळवळीला हादरा तर आहेच पण समाजाचंही तेवढंच नुकसान म्हणावं लागेल.

Comments


bottom of page