top of page

हवामानात बदल, पेरणीपूर्व मशागतींना वेग मान्सूम आगमणाचा उत्साह; खरिप हंगामसाठी बळीराजाची तयारी





हवामानात बदल आणि अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे राज्यभरता खरिपाच्या पेरणी पूर्व मशागतींना वेग आला आहे. दरवर्षी शक्यतो मे महिण्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पेरणीपूर्व मशागतींची लगबग सुरू होते. मात्र, यंदा हवामान खात्याने समाधानकारक आणि लवकरच मान्सुमचे आगमन होण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच नांगरणी नंतर अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे मोघडा -पाळीसह पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे.


मराठवाड्यात रब्बी पिकानंतर खरिपासाठी शेती पिकासाठी नांगरणी, खुरटणीसह मशागतीची कामे केली जातात. कोरडवाहू, निमबागायती क्षेत्रात या मशागतीच्या कामांना प्राधान्य दिले जाते. बागायती क्षेत्रात रब्बी नंतर तीनमाही पिकाच्या उत्पादनावर भर दिला जातो. कांदा, काकाडी, कलिंगड आदी उत्पादनं रब्बी नंतर बागायती क्षेत्रात घेतली जातात. दरम्यान, कोरडवाहू क्षेत्रात रब्बी नंतर उन्हाळी मशागती उरकून खरिपासाठी वरुणजाची प्रतिक्षा लागते.




यंदा मान्सुम लवकरच दाखल होणार असल्याचा अंदाज दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीलसाठी अवघा पंधरवाडा शिल्लक असल्यामुळ शेतकरी मशागतीत व्यस्त आहे. काळ्याची ओटी भरण्यासाठी बीयाने-खतांच्या तयारीला लागला आहे. दरम्यान, आलिकडच्या काळात वेळेसह पैशाची बचत व्हावी या उद्देशाने ग्रामीण भागातला शेतकरी यांत्रीकी शेतीकडे वळला आहे. त्यामुळे जनावरांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. शेतकर्‍यांच्या दावणीला दुधाळ जनावरां शिवाय मशागतीसाठी क्वचित एखादा बैल अढळून येतो. त्यामुळे नांगरणी पासून खूरटणी ,पेरणी, कोळपणीची कामे यंत्रद्वारे केली जात असल्याने रासायणीक खतांचा वापर वाढला आहे.

हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साह आहे. जूनपूर्वीच मान्सून आगमन गृहित धरून शेतातील गवताची काडं वेचणी, कपाशीच्या पर्‍हाटी, तुर्‍हाटींचे व्यवस्थापनाच्या कामांना वेग आला आहे.

Kommentarer


bottom of page